पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील अधिक चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वी बलकौर सिंग आणि चरण कौर यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. त्याच्या आई-वडिलांनी मुलाचे नाव शुभदीप ठेवले, जे त्याच्या दिवंगत भावाचेही नाव होते. सिद्धू मूसेवालाच्या कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये बलकौर, शुभदीप आणि चरण कौर दिसत आहेत. काळ त्यांचा हा फॅमिली फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला होता. समोर आलेल्या फोटोमध्ये बलकौर सिंग आणि त्यांची पत्नी त्यांच्या मुलाला त्यांच्या मांडीवर घेऊन बसले आहेत आणि कॅमेराकडे पाहत आहेत. छोटा शुभदीपही मांडीवर बसून अतिशय गोंडस स्मितहास्य दिसून येत आहे. (siddhu musewala little brother)
आता सिद्धूच्या लहान भावाचा अन्नप्राशन सोहळा पार पडला आहे. याबद्दलचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये छोटा शुभदीप पाटावर बसलेला दिसून येत आहे. घरातील सर्व लोक एक एक करुन त्याला अन्न भरवताना दिसत आहेत. तसेच समोर प्लेटमध्ये मिठाई, दूध व खाण्याचे इतर पदार्थदेखील ठेवले आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सिद्धूचे चाहते खूप भावुक झाले आहेत.
व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “छोटा सिद्धू”, दुसऱ्या एकाने लिहिले की, “हा एकदम सिद्धूसारखा दिसतो”, तसेच अजून एकाने लिहिले की, “लेजिंड कधी मरत नाहीत”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “वाईट नजरेपासून याचे रक्षण होऊदे”.
दरम्यान २९ मे २०२२ रोजी मानसा येथे सिद्धूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा सिद्धू २८ वर्षांचा होता. मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. हल्लेखोरांनी त्याच्यावर ३० हून अधिक राऊंड फायर केले आणि स्थानिकांना तो ड्रायव्हरच्या सीटवर सापडला. सिद्धूच्या आईने ५८ व्या वर्षी शुभदीपला जन्म दिला.