बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे २०२० साली निधन झाले. आता त्या या जगात नसल्या तरीही आजही त्यांचे काम प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी आजवर २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मात्र त्यांचा राग आजवर सगळ्यांनी पाहिला आहे. त्यांनी रागावल्याचे अनेक किस्से सगळ्यांनीच ऐकले आहेत. अशावेळी त्या कलाकारांबरोबर कशाप्रकारे वागायच्या? त्यांच्यावर किती प्रमाणात रागवायच्या याबद्दल आता नृत्यदिग्दर्शक टेरेंस लुईस यांनी कारणं सांगितले आहेत. तसेच सरोज यांच्याबद्दलचे अनेक खुलासे टेरेंसने स्पष्ट केली आहेत. मात्र असे वागण्यामागे नक्की काय कारणं आहेत हेदेखील टेरेंसने स्पष्ट केले आहेत. (terence lewis on saroj khan)
कॉमेडियन भारती सिंह व हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये टेरेंसने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्याने सरोज यांच्या रागावण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. या मनोरंजन सृष्टीने कसे सरोज यांना वागण्यास भाग पाडले याबद्दल त्यांनी सांगितले आहे. त्याने सांगितले की, “जे लोक विचारतात की सरोज लोकांबरोबर अशा का वागायच्या ? त्यांना हे माहीत असायला हवं की ज्या ठिकाणी पुरुषांची चलती आहे त्या ठिकाणी महिलांनी या काम करणं किती कठीण असतं”.
पुढे तो म्हणाला की, “आम्हा पुरुषांना इतकं काही करायची काहीही गरज नसते मात्र एक महिला म्हणून तुम्हाला या पुरुषांची सत्ता असलेल्या क्षेत्रात काम करावं लागेल. पण लोकांनी त्यांच्यामधील महिलेला मारलं. हेच कारण आहे की त्या पुरुषांसारखे वागायच्या. तसेच त्या फार कमी प्रेमाने बोलायच्या”.
दरम्यान सरोज यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, डान्सिंग क्वीन या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे ३ जुलै २०२० साली निधन झाले. निधनावेळी त्या 71 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 17 जून २०२० रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती.