सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“निर्माते एकत्र येत ब्लॅकलिस्ट करतात आणि…”; थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरनंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “फायदा झाला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 5, 2026 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aastad Kale Post About Producers Who Don't Pay On Time

आस्ताद काळेची पोस्ट

Aastad Kale Post About Producers Who Don’t Pay On Time: अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी मानधन थकवल्याची तक्रार केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता शशांक केतकरने देखील नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. पाच वर्षे झाली… अजून पैसे मिळाले नाहीत, आता कुंडली सकट व्हिडीओ शेअर करेन असं म्हणत शशांक केतकरने ही पोस्ट शेअर केली. अशातच लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळेने देखील यासंदर्भात सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत निर्मात्यांकडून कशी फसवणूक होते याबाबत आपले स्पष्ट मत मांडले आहे. ही पोस्ट शेअर करत तो म्हणाला, “आपण एकत्र येऊया? एक होऊया? मराठी दूरचित्रवाणीच्या (television) क्षेत्रात एक रुढ परंपरा आहे. कदाचित हिंदीतही असेल, पण ते मला माहीती नाही. मी तिथे काम केलेलं नाही. तर परंपरा अशी की, काही निर्माते एकत्र येऊन एखाद्या कलाकाराला BLACKLIST करतात. त्याला/तिला काम मिळू द्यायचं नाही हे आपापसात मिळून ठरवतात. कधीकधी, नव्हे बऱ्याचदा त्या कलाकाराचा यात दोष असतो. बेशिस्त वागणं, अवाजवी मागण्या करणं वगैरे पैलू त्यात कारणीभूत ठरतात. (मी ‘त्या’ यादीत येता येता राहिलोय,वाचलोय.,माझ्याच चुकांमुळे, आणि त्या वेळीच सुधारल्यामुळे.) त्यामुळे मला हे नक्की माहीती आहे. पण काही सद्भावी, सहृदयी, प्रामाणिक आणि शिवाय प्रसिद्ध कलाकार आहेत ज्यांना केलेल्या कामाचे पैसेच देत नाहीत. निर्माते मग फार प्रसिद्धी न मिळालेल्या कलाकारांची या बाबतीतील व्यथा तर बोलायलाच नको. नको? बोलायलाच हवी…” (Aastad Kale Post About Producers Who Don’t Pay On Time)

आणखी वाचा: आशिष विद्यार्थी आणि पत्नीचा रस्ता अपघात, आता दोघांची तब्येत कशी?, अभिनेते स्वतःच म्हणाले, “थोडी दुखापत…”

पुढे तो म्हणाला, “काही राजकीय पक्षांच्या संघटना आहेत, ज्या कलाकारांच्या प्रश्नांसाठी काम करतात. पण निर्मात्याची जर त्या पक्षात किंवा एकूणच राजकीय वर्तुळात खूप ओळख आणि ऊठबस असेल तर? तर पुन्हा हात बांधले जातात आणि तोंड बंद होतं.(हाही अनुभव मला स्वत:ला आलेला आहे)एखादी मालिका फार चालली नाही, तर निर्मात्याचं नुकसान होतं. तेव्हा कलाकारांनी त्या नुकसानातील वाटा उचलणं अपेक्षित असतं. राहिलेल्या मानधनातले ५०% कमी करून देण्याच्या offers मला स्वत:ला आलेल्या आहेत.” (Aastad Kale Post About Producers Who Don’t Pay On Time)

शेवटी तो म्हणाला, “पण जर मालिका चालली, फायदा झाला, तर त्याचा वाटा मात्र कलाकरांच्या नशीबी येत नाही. हे आणि हेच विदारक सत्य आहे. कलाकारांनी एकत्र येणं गरजेचं आहे. निर्मात्यांचं जसं एक GUILD आहे तसं तयार करणं गरजेचं आहे. काही निर्मात्यांना कलाकारांनी एकत्र येऊन BLACKLIST करणं गरजेचं आहे. Channels कडून या काही निर्मात्यांना डावललं जाणं गरजेचं आहे. हातांच्या बोटांवर मोजता येतील इतके विश्वासार्ह निर्माते आहेत आज मराठी televisionमध्ये आहेत. बाकी अनेक बुडवे आहेत. पण तरी त्यांना Channels कडून projects मिळत राहतात. म्हणून कलाकारांनी एकत्र येणं, आपलं एक स्वतंत्र GUILD उभं करणं गरजेचं आहे.” (Aastad Kale Post About Producers Who Don’t Pay On Time)

आणखी वाचा: महाराष्ट्रात ‘क्रांतीज्योती विद्यालयची’ हवा, पहिल्याच विकेंडला कोटींची कमाई केली अन…; चित्रपटाचं तोंड भरून कौतुक

Tags: aastad kaleAastad Kale Postentertainmentmarathi actormarathi actressshashank ketkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Shashank Ketkar On Mandar Devsthali

"मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न…"; शशांक केतकरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, म्हणाला, "लाखो रुपये बुडवले आता…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.