बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न…”; शशांक केतकरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, म्हणाला, “लाखो रुपये बुडवले आता…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 5, 2026 | 6:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shashank Ketkar On Mandar Devsthali

अखेर शशांक केतकरची निर्मात्यावर कारवाई

Shashank Ketkar On Mandar Devsthali: मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याने निर्मात्याकडून पैसे न मिळाल्याच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता. गेल्या पाच वर्षांपासून एका प्रोजेक्टचे मानधन मिळाले नसल्याचा आरोप करत शशांकने ‘हे मन बावरे’ चे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैशांची थकबाकी करण्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण होताच अभिनेत्याने थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं. इतकंच नाही तर अभिनेत्याने या स्पष्टीकरणाशिवाय डिटेल व्हिडीओ काय असेल हे जर उद्यापर्यंत पैसे नाही आले तर पोस्ट करत सांगणार असल्याची धमकी सुद्धा दिली आहे. अशातच अभिनेत्याने यासंदर्भात थेट सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

मंदार देवस्थळी यांनी आजच्या दिवसात पैसे देतो असं सांगितलं होतं. पैसे दिले नाही तर कारवाई करणार असं शशांकने म्हटलं होतं. त्यानंतर शशांकने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. शशांकने व्हिडीओसह मंदार देवस्थळी यांच्याबरोबरचे चॅट्सचे काही स्क्रिनशॉट्स देखील शेअर केले आहेत. (Shashank Ketkar On Mandar Devsthali)

आणखी वाचा: “निर्माते एकत्र येत ब्लॅकलिस्ट करतात आणि…”; थकबाकी प्रकरणावर शशांक केतकरनंतर आणखी एका मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “फायदा झाला…”

तसेच शशांकने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं , “मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी या उत्तम दिग्दर्शकाचा आणि ‘हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा या साठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉट्स सकट पोस्ट करत आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, darling, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो. ५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेचे पर डे प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले. बरं, ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे.” (Shashank Ketkar On Mandar Devsthali)

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

पुढे तो म्हणाला, ” युट्युबवर ४ वर्षांपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न दिसतो. आणि आमच्या पैसाच केलं काय याबद्दल चकार शब्द काढत नाही तो असो, या पुढचा व्हिडीओ बाकी सगळ्या लीगल डिटेल्स सकट असेल लवकरच. याच्यामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामाला मी किंवा टीममधील कोणीही जबाबदार नसेल. इथे हे आवर्जून सांगाव लागेल सगळेच निर्माते असे फ्रॉड अजिबात नसतात. त्यामुळे हे फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी याच्याबद्दल आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक उत्तम निर्माते आहेत. त्यांना नक्की कळेल मी काय म्हणतो आहे. आम्ही उत्तम काम करुन तुमचं प्रोजेक्ट चालवतो, तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमच काम उत्तम करा.” असं लिहीत त्याने संताप व्यक्त केला आहे. याबरोबरच शशांकने मंदार देवस्थळी आणि त्याच्यामध्ये झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट्स देखील या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. (Shashank Ketkar On Mandar Devsthali)

आणखी वाचा: लग्नाच्या ११ वर्षानंतर टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोट; खुलासा करत म्हणाला, “हो आम्ही वेगळे झालो…”

Tags: entertainmenthe man bavaremandar devasthalimarathi actorshashank ketkarShashank Ketkar On Mandar Devsthali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Shashank Ketkar Slammed Mandar Devsthali

"आत्महत्येची भीती दाखवतो…"; शशांक केतकरचे मंदार देवस्थळीवर आरोप, व्हिडीओ शेअर केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.