मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट हिने तिच्या करियर ची सुरुवात २००० सालच्या बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून अभिनयाची सुरुवात केली. ती संजय दत्तच्या मुन्ना भाई एम.बी.बी.एस आणि लगे राहो मुन्ना भाई या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा झळकली होती. नवा गडी.. नवं राज्य या नाटकात ती पती उमेश कामत सोबत दिसली होती. तिने उमेश सोबत दादा एक गुडन्युज आहे या नाटकाची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले. प्रिया तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. प्रिया तिचे व तिचा पती उमेशचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या फोटो शूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. (Priya Bapat Photoshoot )
या फोटोशूटसाठी प्रियाने ब्राऊनगोल्डन अशा मिक्स शेडचा ड्रेस परिधान केलाय. या लूकमध्ये प्रिया बोल्ड अंदाजात पाहायला मिळतिये. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि काही कलाकारांनी “फ्लॉवर नही फायर हैं” तसेच हॉट, गॉर्जस अशा छान कमेंट्स केल्या आहेत.
हे देखील वाचा: शिवकन्या देतेय गडकिल्ले संवर्धनाची हाक
उमेश कशी देतो प्रियाला तिच्या निर्णयात साथ
प्रिया अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे सुद्धा चर्चेत असते. कोविडच्या वेळेस जिम बंद असताना प्रिया उमेश सोबत घरीच वर्कआउट करत असे. आणि याचे व्हिडियो आणि फोटोज सोशल मीडियावर देखील शेअर करत होती. याच बरोबर प्रिया तिच्या डाएटच्या बाबतीत सुद्धा खूप शिस्त बद्ध आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी मराठी फिल्मइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोडी असून या दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे. प्रिया बारावीमध्ये असतानाच उमेशच्या प्रेमात पडली होती.
उमेश प्रियाला तिच्या प्रत्येक निर्णयात तिची साथ देताना दिसतो. प्रिया उमेशच्या लग्नाला ११ वर्षे पूर्ण झाले असून मराठी सिनेविश्वात या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पहिले जाते. याचबरोबर प्रिया आणि उमेशला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो त्यामुळे ते कामातून वेळ मिळाला की एकत्र बाहेर फिरायला जात असतात. मध्यतंरी काश्मीरला फिरायला गेले होते.(Priya Bapat Photoshoot )
हा देखील वाचा: “पोस्ट ऑफिस उघडं आहे” मालिकेचा नवा ट्रेंड कलाकारांनी पोस्ट केले ९०च्या दशकातील फोटोज
प्रियाने अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. टाईमपास २, वजनदार, आम्ही दोघी, काकस्पर्श, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत. तिचा पती उमेश सोबतचा ” आणि काय हवं” ही मराठी वेबसिरीज सुद्धा खूप गाजली होती. या व्यतिरिक्त प्रिया “सिटी ऑफ ड्रीम” या हिंदी वेबसिरीजच्या दोन्ही भागात दिसली आहे. प्रियाने बापटने काही रियालिटी शोचे सूत्र संचालन सुद्धा केलं आहे.