उन्हाळयाच्या सुट्टीत शहराकडून गावी जायची इच्छा ही सुट्टी लागण्याच्या १ महिना आधी पासूनच मनात घर करायची. गावी जाऊन लाडक्या आजी आजोबांना बाबा, आजी, किंवा आजोबा अशी हाक मारण्यात जे सुख होत ते कुठे हे सापडणार नाही. म्हणतात जगातल सगळ्यात प्रेमळ नातं असत ते बाप लेकीचं आणि त्याहून ही आणखी प्रेमळ नातं म्हणजे आजोबा आणि नातवंडाचं. म्हतारपणात आपल्या पोरं बाळांपेक्षा नातवंडावर जास्त प्रेम करणं त्याचे लाड पुरवणं हा बऱ्याच आजी आजोबांचा आवडता छंद असावा.(Mahesh Kothare Jija Kothare)
मंडळी या नात्यांबद्दल फक्त टीव्ही वर दाखवलं जात असं नाही तर आपल्याला टीव्ही वर ही नाती भासवणारे कलाकार खऱ्या आयुष्यात ते जगत देखील असतात. आजोबा आणि नातीच प्रेमळ नातं असलेलं एक कुटुंब म्हणजे प्रसिद्ध दिगदर्शक महेश कोठारे आणि त्यांची नातं ‘जिजा’.

जिजा म्हणजे माझ्यासाठी..(Mahesh Kothare Jija Kothare)
बऱ्याच मुलाखतींमध्ये महेश कोठारे यांना त्यांच्या सतत आनंदी राहण्याचं कारण विचारलं जात तेव्हा ते सांगतात कितीही दमून, थकून घरी गेलो तरी माझी नातं जिजा माझ्या स्वागतासाठी उभी असते त्यामुळे माझा सारा थकवा निघून जातो आणि अगदी ताजतवानं वाटत. जिजा बद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेताना महेश यांनी जिजाच वागणं बोलणं आणि इतर गोष्टींबद्दल देखील सांगितलं आहे. महेश कोठारे जिजा बद्दल सांगताना पुढे म्हणाले’ कोठारे घरात कन्यारत्न व्हावं ही माझी खूप मनापासून इच्छा होती आणि जिजाच्या येण्यानं ती पूर्ण झाली.(Mahesh Kothare Jija Kothare)
महेश हे जिजाला शाळेत सोडण्यापासून ते घरी परत आणण्या पर्यंत जिजा संबंधित सगळी कामं अगदी आनंदानं करतात. शिवाय त्यांनी जिजा बद्दल सांगताना पुढे सांगितलं कि जिजाच अरे तुरे मध्ये मला किंवा आजी ला आवाज देणं आम्हाला खूप आवडत. जिजाच्या भविष्या बाबत विचारलं असता महेश कोठारे सांगतात कि जिजांन जागतिक कीर्तीची आणि जगातील नंबर वन टेनिसपटू व्हावं. जिजा बद्दल अनेक गमतीदार, प्रेमळ किस्से महेश कोठारे यांनी वारंवार शेअर केले आहेत. एवढच काय डॅम इट आणि बरच काही हे आत्मचरित्र सुद्धा त्यांनी जिजाला समर्पित केलं आहे. आजोबा आणि नातीच नातं कस असावं हे महेश कोठारे आणि त्यांची नातं जिजाला पाहिल्यावर कळतं.
हे देखील वाचा – ‘शरीरप्रदर्शन करायची माझी….’म्हणून अलका कुबल यांनी नाकारले हिंदी चित्रपट
