शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शिवानी सुर्वेच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्ये मराठी कलाकारांचा दंगा, जबरदस्त डान्स अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 1, 2024 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shivani Surve And Ajinkya Nanaware Engagement Update in marathi

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांचा साखरपुडा

Ajinkya Nanaware And Shivani Surve Engagement : अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा शाही साखरपुडा सोहळा नुकताच थाटामाटात संपन्न झाला. गुपचूप साखरपुडा सोहळा उरकत शिवानी-अजिंक्यने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. अगदी पारंपरिक अंदाजात दोघांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. दोघांच्या साखरपुडा समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले आहेत. त्यांच्या साखरपुड्याची बातमी दोघांनी सोशल मीडियावरुन फोटो व पोस्ट शेअर करत दिली.

दरम्यान, शिवानी व अजिंक्यवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. शिवानी-अजिंक्य दोघांवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनीही शुभेच्छा देत दोघांचं अभिनंदन केलं आहे. तर अभिनेता माधव देवचक्के याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शिवानीच्या लग्नापूर्वीच्या विधींमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत ‘बिग बॉस’मधील अनेक कलाकार मंडळी शिवानीसह थिरकताना दिसत आहेत. नेहा शितोळे, मेघा धाडे, श्वेता मेहंदळे ही कलाकार मंडळी थिरकताना दिसत आहेत. सर्व कलाकारांनी शिवानीच्या लग्नात धमाल केलेली पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडप सजला, पाहुणे मंडळीही जमली अन्…; ‘या’ ठिकाणी पार पडणार अजिंक्य-शिवानीचं लग्न, जय्यत तयारी सुरु

शिवानी व अजिंक्यच्या लग्नाची सर्वत्र धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याची लगबगही समोर आली आहे. लवकरच ही लोकपप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. साखरपुड्यानंतर शिवानी व अजिंक्यच्या हळदीसाठी सजलेल्या मंडपाचे फोटोही समोर आले आहेत. यावरुन त्यांची हळद उरकली असल्याचं कळतंय. मात्र अद्याप हळदी समारंभातील फोटो समोर आलेले नाहीत. शिवानी व अजिंक्यच्या लग्नसोहळ्याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Maadhav C Deochake (@maadhavcdeochake)

आणखी वाचा – Video : …अन् होणाऱ्या बायकोला कोणत्या हातामध्ये अंगठी घालावी हेच अजिंक्य ननावरेला कळेना, शिवानी सुर्वेने पाहुण्यांनाच विचारलं आणि…; व्हिडीओ व्हायरल

ठाण्यातील येऊर हिल येथे थाटामाटात संपन्न झालेल्या शिवानी व अजिंक्यच्या साखरपुडा सोहळ्यातील लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. साखरपुड्यासाठी शिवानीने परिधान केलेल्या फिकट जांभळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुललं होतं. वेस्टर्न लूकवर तिने हिरव्या बांगड्यांचा चुडा घातला होता. तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, जॅकेट व त्यावर टोपी घातली होती.

Tags: entertainmentshivani surveshivani surve and ajinkya nanawareshivani surve and ajinkya nanaware engagedshivani surve and ajinkya nanaware engagementshivani surve boyfriend
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Sanjay leela bhansali Netflix series heeramandi first look revealed sonakshi sinha aditi rao hydari Manisha koirala richa chadha in this series

संजय लीला भन्साळींच्या बहुचर्चित ‘हिरामंडी’ चित्रपटाची पहिली झलक समोर, अभिनेत्रींच्या लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.