Ajinkya Nanaware And Shivani Surve Wedding : ‘अखेर बंधनात’ म्हणत अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा सोहळा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. अगदी शाही थाटामाटात त्यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. अजिंक्य व शिवानी यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. यानंतर आता साऱ्यांच्या नजरा दोघांच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत. अजिंक्य-शिवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
काही वेळातच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान त्यांच्या लग्नमंडपांचेही व्हिडीओ पाहायला मिळाले. ठाण्यातील येऊर हिल येथे शिवानी व अजिंक्य यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण समोर आले आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाची एन्ट्री पाहायला मिळत आहे. अजिंक्य नवरदेवाच्या लूकमध्ये खूप खास दिसत आहे.
लग्नासाठी शाही थाटमाट पाहायला मिळत आहे. नवरदेवाने थेट घोडयावर बसून एंट्री घेत मंडपात येताना दिसत आहे. तर वाजत गाजत भव्य मिरवणूक सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अजिंक्यच्या कुटुंबीयांनी नाचत नाचत त्यांचं स्वागत केलेलं पाहायला मिळत आहे. तर काहीजण फुगड्या घालतानाही दिसत आहेत. काही वेळातच हा नवरदेव बोहोल्यावर चढण्यास सज्ज होणार असल्याचं समोर येत आहे. शिवानी व अजिंक्यच्या लग्नाची सर्वत्र धामधूम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याची लगबगही समोर आली आहे.
शिवानी व अजिंक्यच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहते मंडळींनी व कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. शिवानी व अजिंक्यच्या लग्नासाठी सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी उपस्थित आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास डेकोरेशनचेही व्हिडीओ समोर आले. त्यांच्या या डेकोरेशनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं पाहायला मिळालं.