‘बाबाला कर्करोग असल्यानं उपचारासाठी हॉस्पिटलला असताना लिहायचे आईला पत्र’ जुनी पत्रं वाचून पृथ्वीकची भावुक पोस्ट

Prithvik Pratap Emotional Post
Prithvik Pratap Emotional Post

‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका ४० भागांची असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं होत आणि आता या मालिकेने साऱ्यांचा निरोप घेतलाय. दरम्यान मालिकेतील कलाकारांनी एक ट्रेंड सुरु केला आहे. त्यांनी १९९७ सालचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आठवण शेअर केलीय. यांत सगळ्याच कलाकारांचा सहभाग पाहायला मिळाला. अशातच पृथ्वीकने शेअर केलेल्या फोटोसह त्याच्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय.(Prithvik Pratap Emotional Post)

पहा पृथ्वीकची भावुक पोस्ट (Prithvik Pratap Emotional Post)

पृथ्वीकने भावुक होत केलेली ही पोस्ट वाचून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. यावेळी त्याने लिहिलंय, ‘२ एप्रिल २०२३ ला ‘पोस्ट ॲाफिस उघडं आहे’ चा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्या निमित्ताने १९९७ सालचे फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आणि आज दुपार पर्यंत खूप शोधा शोध करुनही मला १९९७ सालचा माझा एकही फोटो मिळाला नाही. पण एक अत्यंत महत्त्वाची वस्तू सापडली ती म्हणजे ‘माझ्या वडिलांनी माझ्या आईला लिहीलेली पत्र’ १९९३ ची ही पत्र… बाबा ला कर्करोग असल्यानं तो उपचारासाठी मुंबईच्या एका हॅास्पिटल ला ॲडमिट होता. अंधेरीत आमच्या नातेवाईकांकडे बाबा महिना- दोन महिना राहिला होता… नातेवाईकांवर जास्त भार नको म्हणून आई माझ्या वडिलांपासून बऱ्यापैकी लांब राहत होती.

photo credit : instagram

कधी तिच्या आई वडिलांकडे सूरत ला, कधी सासू सासऱ्यांकडे गावी, कधी भावाकडे, कधी पुण्याच्या भाड्याच्या घरात… आणि या धावपळीत २ आठवड्यातून एकदा-दोनदा त्यांची भेट होत असे. पण त्यांची एकमेकांसाठीची काळजी, प्रेम, माया आणि सगळ्या सगळ्या भावना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा जो होता तो म्हणजे ‘पत्र’. ३ एप्रिल २०२३ ला ही सगळी जुनी पत्र जी आईने बाबाला आणि बाबाने आईला लिहीली होती ती पहिल्यांदा वाचली. डोळे पाणावले, थोडा स्तब्ध झालो, कधी चेहऱ्यावर स्मित आलं कधी अगदीच गहिवरून आलं.

सगळी पत्रं वाचून काढली.. सगळे क्षण खऱ्या अर्थाने त्या त्या काळात जाऊन अनुभवले..जगलो.. पुढे अल्पावधीत बाबा निधन पावला आणि हा पत्रव्यवहार कायमचा थांबला. सगळा पसारा आवरून शांत बसलो असताना एक गोष्ट लक्षात आली; तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी ते जास्तीत जास्त मेंदू पर्यंत पोहोचेल पण पत्रांसारखं मनाचा ठाव कधीच घेऊ शकणार नाही.

हे देखील वाचा – आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’

‘पोस्ट ॲाफिस उघडं आहे’ च्या निमित्ताने पोस्टाच्या जवळ जाऊ शकलो आणि पत्रांच महत्त्व समजू शकलो. यानंतर त्याने सोनीमराठी, वेट क्लाउड प्रोडक्शन,अमित फाळके,सोहा कुलकर्णी,सचिन गोस्वामी, सचिन मोटे, अवधूत पुरोहित यांचे आभार मानलेत. पुढे त्याने लिहिलंय ‘हा  माझा आणि दादाचा हा फोटो कदाचित १९९५-९६ चा असावा. १९९७ चा फोटो अजूनही सापडला नाहीये.(Prithvik Pratap Emotional Post)

photo credit : instagram

अगदी पृथ्वीकने म्हटल्याप्रमाणे पत्रांसारखा मनाचा ठेवा कुणीही जपणार नाही. आज पृथ्वीकचे बाबा आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या पात्रांनी पुन्हा एकदा त्यांच्या सोन्याची जाणीव लकरून दिली. पत्र हे माध्यम होत म्हणून कर्करोगासाठी उपचार करण्यासाठी मुंबईत असणारे पृथ्वीकचे बाबा त्याच्या आई पर्यंत पत्रातून पोहचू शकले. पत्र हा त्यांच्यातला दुवा ठरला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

आज पृथ्वीकने केलेली पोस्ट पाहून पुन्हा एकदा पत्रव्यवहाराची महती पटली. आजच्या इंटरनेटच्या दुनियेत आपण जरी बरेच पुढे गेलो असलो तरी ही पत्र आपल्याला जोडून ठेवतायत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज आपण पत्रव्यवहार पूर्णच थांबवलाय मग जरा मागे वळून पाहिलं तर तो व्यवहार अनुभवणं खूपच रंजक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Amir Khan New Controversy
Read More

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपट नाकारल्यामुळे आमिर खान झाला सैरभैर – अभिनेत्याने ट्विट करत वेधले लक्ष्य

आपल्या अभिनयातील सहजतेने, लूक्सने अभिनेता अमीर खानने कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अनेक दमदार आणि हिट चित्रपट देऊन…
Gautami Patil Wedding
Read More

बीडच्या तरुणाची “गौतमी पाटीलला थेट लग्नाची मागणी” पत्र लिहीत केल्या भावना व्यक्त

सध्या जास्त महत्व आहे ट्रेंडिंग गोष्टींना आणि फक्त काही घटनांचा नाहीतर काही व्यक्तिमत्व सुद्धा चांगलीच चर्चेत आहेत. मग…
Sayali sanjeev Ruturaj Gaikwad
Read More

ऋतुराज आणि बायकोचा फोटो सायलीच्या कमेंटने वेधलंय लक्ष

यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये तिने चेन्नई सुपरकिंगने बाजी मारली. सर्वत्र चेन्नई सुपर किंग्सच नाव घेतलं जातंय, सोशल मीडियावरही त्यांच्या…
Rohit Parshurm Wife Babyshower
Read More

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील ‘अर्जुन’ म्हणजेच अभिनेता ‘रोहित परशुरामच्या’ बायकोचे डोहाळे जेवण

झी मराठी वरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका चर्चेत असणाऱ्या मालिकांन पैकी एक आहे. मालिकेचे कथानक, येणारी वेगवेगळी…
Gargi Phule Joined NCP
Read More

‘मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची २ कारणे होती’ – गार्गी फुले

राजा राणीची ग जोडी या मालिकेतून घराघरात पोहचलेली आणि निळू फुले यांची मुलगी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री गार्गी…
Naseeruddin Shah
Read More

अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी केरला स्टोरी बदल बोलताना साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

अभिनेता नसिरुद्दीन शाहांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगेळे स्थान निर्मण केले आहे. त्यांच्या अभिनयासोबतच ते त्यांच्या स्पष्ट…