प्रेक्षकांच्या दररोजच्या जीवनात एक महत्वाचा घटक ठरल्या आहेत त्या म्हणजे रोज विविध विषय मांडणाऱ्या मालिका. मनोरंजनाचं एक महत्त्वाच साधन म्हणजे मालिका. अनेक वेगवेगळ्या विषयाच्या मालिका सध्या प्रेक्षकांच भरभरून मनोरंजन करत असतात. मालिकांच्या या शर्यतीत आघाडीवर असलेली एक मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’. ‘होणार सून मी या घरची’, ‘अग बाई सासूबाई’ या मालिकांमधून घरोघरी पोहचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून पुनरागमन करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या रंजक वळणावर असल्याच पाहायला मिळतय. (Premachi Goshta Serial Update)
मालिकेत मुक्ता-सागरच नव्याने फुलणारी प्रेमकहानी पाहणं प्रेक्षक पसंत करत आहेत. परंतु मुक्त-संगरच्या नात्यात सध्या दुरावा आलं आहे आणि तो हा दुरावा संपवण्यासाठी सागरचे चांगलेच प्रयत्न देखील सुरू आहेत. अशातच मालिकेच्या एका नव्यय प्रोमोने प्रेक्षकांच लक्ष वेधल आहे. मालिकेच्या प्रोमोनुसार सागरच्या घरात अंधाराचा फायदा घेत कार्तिक मुक्ताला मिठी मारतो आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर मुक्ता आरडाओरड करते आणि सगळे तिथे जमा होतात. त्याआधी कार्तिक मुक्ताची माफी मागतो आणि मी स्वातीला देखील असेच सरप्राइज देतो असे म्हणतो. तेवढ्यात स्वाती तिथे येते पण मुक्ता याबद्दल तिला काहीही सांगत नाही.
मुक्ताचा राग होणार का शांत?
दुसरीकडे मुक्ताचा राग शांत करण्यासाठी सागरचे अतोनात प्रयत्न चालू आहेत. मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सागर नोकराच्या वेशात जातो पण सागरच भिंग फुटतं आणि मुक्ता पुन्हा सागरवर रागावते. मुक्ता सागरला म्हणते “तु्म्हाला हा सगळा भावनांचा खेळ वाटतो का, एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडणं कठीण असते”. तर दुसरीकडे इंद्रा देखील मुक्तावर चिडलेली पाहायला मिळते.(Premachi Goshta Serial Update )
इंद्रा देणार मुक्ताला शिक्षा?
घरात इंद्रा सर्वांसाठी मांसाहारी जेवण बनवते पण मुक्तासाठी कोणताही शाकाहारी पदार्थ बनवला जात नाही. यावरून सागर चिडतो आणि “मुक्तासाठी एखादी भाजी बनवायला हवी होती. एखाद्याला उपाशी का ठेवायचं” असं मानतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर घरातील सगळे देखील इंद्राच्या या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. सागर मुक्ताला जेवण्याची विनंती करतो पण मुक्ताची नाराजी काही दूर होत नाही तेव्हा सई मुक्तासाठी शेजारच्या काकूंकडून शाखाहरी जेवण घेऊन येते आणि मुक्ताला जेवण्याचा आग्र्ह करते.
आता मालिकेत पुढे कोणतं रंजक वळण येणार? मुक्ता सागर यांच्यामधील हा दुरावा संपणार का? ही पाहून रंजक ठरणार आहे.