बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, ‘डॉन आंटी’च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, “भावा कडक…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 11, 2024 | 1:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Atharva Ruke Content creator’s Don Aunty and Khala Chachi videos going viral on social media

सामान्य कुटुंबातून आलेल्या अथर्व रुकेची सोशल मीडियावर हवा, 'डॉन आंटी'च्या व्हिडीओवर सेलिब्रिटीही फिदा, म्हणाले, "भावा कडक..."

सोशल मीडियावर सध्या कंटेट क्रिएटर्सची चांगलीच चलती आहे. सोशल मीडियावर अनेक कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींचीही मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर असे अनेक कंटेट क्रिएटर्स आहेत, जे अनेक विनोदी व्हिडीओद्वारे नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात. या कंटेट क्रिएटर्सचा सोशल मीडियावर चांगलाच चाहतावर्गदेखील आहे. यापैकीच एक म्हणजे अथर्व रुके. अथर्वने त्याच्या आगळ्या-वेगळ्या कंटेटने सोशल मीडियावर त्याचा दबदबा निर्माण केला आहे.

अथर्व रुकेचे सोशल मीडियावर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर अथर्व अनेक पद्धतीच्या व्यक्तिरेखा चाहत्यांसमोर आणत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या अनेक रील्सना लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही त्याच्या व्हिडीओला पसंती दर्शवतात. अशातच अथर्वचे व्हिडीओ पाहून एका मोठ्या सेलिब्रिटीने त्याचे कौतुक केले आहे.

अथर्व हा सोशल मीडियावर सध्या बऱ्यापैकी चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक रील्स व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच त्याने शेअर केलेली एक स्टोरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अथर्वला ‘बिग बॉस १६’ पर्वाचा विजेता व प्रसिद्ध रॅपर एम. सी स्टॅनने मॅसेज करत त्याचे कौतुक केले आहे आणि याचा स्क्रीनशॉट अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत, अस्तिकाच्या मृत्यूने विरोचकालाही धक्का, मालिकेला नवीन वळण, आता पुढे काय घडणार?

अथर्वचे ‘खाला’ या अनोख्या व्यक्तिरेखेमध्ये साकारलेले अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि एम. सी. स्टॅनलादेखील त्याच्या या ‘खाला चाची’ व्यक्तिरेखेची भलतीच भुरळ पडली आहे. याचेच कौतुक करत एम. सी. स्टॅनने अथर्वला “खालाचे व्हिडीओ भारी करत आहेस. देव तुला आशीर्वाद देवो” असं म्हटलं आहे. यावर अथर्वनेदेखील “त्याला खूप खूप धन्यवाद भाऊ” असं उत्तर दिलं आहे आणि याचाच स्क्रीनशॉट अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – आधी संकर्षण कऱ्हाडेच्या प्रेमात, मुल झाल्यानंतर त्याच्याच नावावरुन ठेवलं मुलाचं नाव; अभिनेता म्हणाला, “मुलाला ठेवून मला भेटायला आली अन्…”

दरम्यान, अथर्व हा सध्याच्या काही आघाडीच्या कंटेट क्रिएटर्सपैकी एक आहे. त्याच्या ‘विचित्र काका’, ‘भाव करणारी बाई’, ‘खाला चाची’, ‘नाजुक Guy’, ‘डॉन आंटी’, ‘शो ऑफ करणाऱ्या काकू’ यांसह अनेक व्यक्तिरेखांना नेटकऱ्यांकडून तूफान प्रतिसाद मिळत आहे.    

Tags: Atharva RukeContent Creatormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Trupti khamkar on crew movie

"१२ तासांचं काम अर्ध्या तासात करायचं अन्…", हिंदी चित्रपटाच्या सेटवर मिळत असलेल्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, "त्यांच्यावरच सगळे कॅमेरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.