शनिवार, एप्रिल 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरुंधतीने संजनाला सुनावलं, मैत्रिणींसमोर आप्पांची माफी मागायला लावली अन्..; दोघींमध्ये मोठा वाद

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2024 | 1:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

अरुंधतीने संजनाला सुनावलं, मैत्रिणींसमोर आप्पांची माफी मागायला लावली अन्..; दोघींमध्ये मोठा वाद

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अरुंधतीचा नवा प्रवास पाहायला मिळत आहे. अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला आलेली पाहायला मिळत आहे. मात्र अरुंधतीचं देशमुखांच्या घरी राहणं संजनाला काही पटलेलं नाही. त्यामुळे ती अरुंधतीच्या मागे हात धुवून लागलेली असते. संजना अरुंधतीला बोलायची एकही संधी सोडत नाही. मात्र वेळोवेळी अरुंधतीही संजनाला उत्तर देताना दिसली आहे. इतकंच नव्हेतर संजना आरोहीच्या व इशाच्या मनातही अरुंधतीविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करते. (Aai Kuthe Kay Karte Promo)

अशातच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये संजना अरुंधतीला चांगलेच बोल लागवताना दिसत आहे. संजना अरुंधतीला सांगते, माझ्या काही मैत्रिणी आज घरी येणार आहेत. मी त्यांच्यासाठी छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. तर अरुंधती मला पार्टीसाठी छान स्टार्टर्स बनवून देशील का प्लिज”, असं विचारते. यावर अरुंधती हो म्हणते. तितक्यात कांचन संजनाला टोकते आणि म्हणते, “एरव्ही अरुंधतीला घराबाहेर काढण्यासाठी टपलेली असतेस”, असं म्हणते.

आणखी वाचा – हिंदी मालिकेत ऋतुजा बागवेला मुख्य भूमिका, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेताही दिसणार, प्रोमो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

यावर संजनाचा चेहरा पडतो. तर इकडे पार्टी सुरु असते, तेव्हा पार्टीत अप्पा काहीतरी खातात आणि जोरात ढेकर देतात. त्यावर संजनाची एक मैत्रीण अप्पांचा अनादर करते. ती अप्पांना म्हणते की, “काय फालतुगिरी आहे. आधी हावरटासारखं खायचं आणि मग सगळ्यांसमोर ढेकर द्यायचा”, असं भर पार्टीत म्हणते. यावर अरुंधती संजनाला सुनावते. अरुंधती संजनाला म्हणते, “हे आई आप्पांचं घर आहे संजना. आणि त्यांच्या घरी येऊन त्यांचा जर कोणी अपमान करत असेल तर ते मी सहन करणार नाही.

आणखी वाचा – “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?”, वयावरुन ट्रोल करणाऱ्यांवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

मृणाल ताईंनी आता आपल्या आप्पांची माफी मागावी”, असं म्हणत तिला सुनावते. हे ऐकून अरुंधतीचा पारा चढलेला असतो आणि ती संजनाच्या मैत्रिणीला चांगलेच सुनावते. आणि आप्पांची माफी मागायला सांगते. आता संजना तिच्या मैत्रिणीला माफी मागायला सांगणार का?, की उलट अरुंधतीला सुनावणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promomarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Marathi Actor Son Name Ceremony
Entertainment

मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

एप्रिल 4, 2026 | 1:12 pm
Rashmika and Vijay Devarkonda New Update
Entertainment

रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 4, 2026 | 12:05 pm
Piyush Mishra On Alcoholism
Entertainment

आईला नको नको ते बोलले, महिलांशी अश्लील संवाद केला; दारूच्या नशेत अभिनेत्याच्या आयुष्याची लागलेली वाट, म्हणाले…

एप्रिल 4, 2026 | 11:00 am
Dipika kakar health update
Entertainment

“शरीरातून १.३ सेमी…”, शस्त्रक्रियेनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पायाखालची जमीन सरकली, आधी कॅन्सरने ग्रासलं आणि…

एप्रिल 4, 2026 | 9:28 am
Next Post
Famous Marathi choreographer Vaibhav Ghuge said that he was often insulted because of his color black.

"कित्येकवेळा फ्रेममधून हटवलं आणि...", त्वचेचा रंग काळा असल्यामुळे सुप्रसिद्ध मराठी नृत्यदिग्दर्शकाचा अपमान, म्हणाला, "काळ्या रंगामुळे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.