सध्या सिनेसृष्टीत वेबसीरिज या माध्यमाला अधिक प्राधान्य मिळालेलं पाहायला मिळत आहे. बरीच कलाकार मंडळी ही वेबसीरिजकडे वळलेली दिसतात. अशातच एका वेबसीरिजने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. कोणताही ओळखीचा चेहरा न घेता केवळ कथानकाच्या आणि नवोदित कलाकारांच्या जोरावर या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही वेबसीरिज म्हणजेच ‘आठवी अ’. (rastyavarachi shala new webseries)
शालेय जीवनातील आणि खेडेगावातील राहणीमानावर आधारित असलेल्या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. या वेबसीरिजचे लाखो चाहते दिवाने आहेत. वेबसीरिजचे भाग प्रदर्शित होण्याआधीच चाहते मंडळी आगामी भागाकडे डोळे लावून बसलेले असतात. ‘आठवी अ’च्या भरघोस प्रतिसादानंतर आता ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ व ‘इट्स मज्जा’ ओरिजनल प्रस्तुत आणखी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होणार आहे. त्यांनी या नव्या वेबसीरिजचे नाव सांगत मुहूर्तही केलेला पाहायला मिळत आहे.
‘रस्त्यावरची शाळा’ असे नाव असलेल्या या नव्या वेबसीरिजची त्यांनी घोषणा केली आहे. ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ आणि ‘इट्स मज्जा’ ओरिजनल नेहमीच आपल्यासाठी आशयघन व मनोरंजक अशा गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. यातच भर घालत त्यांनी ‘आठवी अ’ ही वेबसीरिज आणली. ‘आठवी अ’ला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादानंतर लवकरच आता ‘रस्त्यावरची शाळा’ ही नवी कोरी वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज होणार आहे. या वेबसीरिजमध्ये कोणते कलाकार दिसणार?, नेमकं कथानक काय असणार?, हे अद्याप गुलदस्तात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा ‘आठवी अ’ नंतर ‘रस्त्यावरची शाळा’ या वेबसीरिजकडे लागून राहिल्या आहेत.