मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : माधुरी दीक्षितचा नवऱ्यासह कॅमेऱ्यासमोर रोमान्स, एकत्रित डान्सही केला अन्..; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 9, 2024 | 1:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
madhuri dixit and shriram nene dance

Video : माधुरी दीक्षितचा नवऱ्यासह कॅमेऱ्यासमोर रोमान्स, एकत्रित डान्सही केला अन्..; व्हिडीओ व्हायरल

माधुरी दीक्षित हे हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक आघाडीचे नाव आहे. १९९४ साली तिने ‘अबोध’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्यानंतर ती ‘खलनायक’, ‘हम आपके है कौन?’, ‘देवदास’, ‘दिल तो पागल है’, या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसून आली. चित्रपटांनंतर तिने आपला मोर्चा टेलिव्हिजनकडे वळवला. सध्या ती ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमाचे परिक्षण करताना दिसत आहे. येत्या १५ मे रोजी माधुरीचा वाढदिवस आहे. ती आता ५७ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. पण त्या आधीच तिला शोच्या सेटवर एक सरप्राइज मिळाले आहे. (madhuri dixit and shriram nene dance)

सध्या माधुरी ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमाची परिक्षक आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये माधुरीचे पती श्रीराम नेनेदेखील दिसून येत आहेत. कार्यक्रमाची सूत्रसंचालिका भारती सिंह श्रीराम यांचे स्वागत करत आहे. दोघांनीही स्टेजवर येताना पाहून माधुरी आश्चर्यचकित होताना दिसत आहे. त्यानंतर माधुरीने हे तिच्यासाठी मोठं सरप्राइज असल्याचेही सांगितले. या जोडीने नंतर ‘तुमसे मिलके’ या गाण्यावर डान्स करतानाही दिसत आहेत.तसेच कार्यक्रमामध्ये दाखल झाल्यानंतर श्रीराम व माधुरी दोघांनाही खूप आनंद झाला होता.

आणखी वाचा – गुलाबी टिकली, गुलाबी फ्रॉक अन्…; प्रसाद व मंजिरी ओक यांनी लाडक्या श्वानाचा केला नटापटा, ‘गुलाबी साडी’वरचा व्हिडीओ व्हायरल

१५ मे रोजी माधुरीचा ५७ वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘डान्स दिवाने’च्या निर्मात्यांनी सरप्राइज आयोजित केले होते. बर्थडे स्पेशल एपिसोडमध्ये श्रीराम यांच्याबरोबर त्यांचा पाळीव श्वानाला देखील आणले. ती लगेचच आपल्या पतीकडे गेली आणि आणि नंतर श्वानाकडे वळली. हा व्हिडीओ वाहिनीने शेअर केला असून त्यावर कॅप्शन लिहिले की, “माधुरीच्या बर्थडे स्पेशल एपिसोडच्या मंचावर आले तिचे पती, इथे झाले त्यांचे खास आदरातिथ्य”.

आणखी वाचा – “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?”, वयावरुन ट्रोल करणाऱ्यांवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

याआधी देखील माधुरी व श्रीराम हे एकत्र दिसून आले होते. ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वामध्ये श्रीराम आले होते. त्यावेळी श्रीराम यांना कॅमेरासमोर येण्याची भीती वाटते असे माधुरीने सांगितले होते.

Tags: birthday surprisedancemadhuri dixitshriram nene
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Aai Kuthe Kay Karte Promo

अरुंधतीने संजनाला सुनावलं, मैत्रिणींसमोर आप्पांची माफी मागायला लावली अन्..; दोघींमध्ये मोठा वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.