रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वडिलच तिला दारू पाजायचे आणि…”, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बऱ्याच वर्षांनंतर धक्कादायक सत्य समोर, कर्जामुळे उद्धवस्त अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 21, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pratyusha Banerjee controversial life

“वडिलच तिला दारू पाजायचे आणि...”, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूच्या बऱ्याच वर्षांनंतर धक्कादायक सत्य समोर, कर्जामुळे उद्धवस्त अन्...

‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीचं निधन होऊन बरीच वर्ष ओलांडून गेली आहेत. मात्र तिच्या भूमिका आणि काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. २०१६मध्ये राहत्या घरी प्रत्युषाचा मृतदेह सापडला. तिने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर अनेकांना मोठा धक्का बसला. तसेच कुटुंबियांसाठीही हे दुःख पचवणं अवघड होतं. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर बऱ्याच नकारात्मक गोष्टीही समोर आल्या. तिच्या अफेअरबाबत बोललं गेलं. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे प्रत्युषाचं दारूचं व्यसन. प्रत्युषाला तिचे वडिलच दारु पाजायचे असं आता बऱ्याच वर्षांनंतर समोर आलं आहे. प्रत्युषाचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याने याबाबत माहिती दिली आहे. (Pratyusha Banerjee controversial life)

राहुलने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. त्याने प्रत्युषाच्या आई-वडिलांवरही आरोप केले आहेत. राहुल म्हणाला, “रांचीमधील माझ्या घरी प्रत्युषा आली होती. तेव्हा ती तिच्या जमशेदपुरच्या घरी गेली नाही. तू तुझ्या घरी का गेली नाही? असं मी तिला तेव्हा विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की, राहुलचे आई-वडीलच आता माझे आई-वडील आहेत. कारण माझ्या आई व वडिलांनी मला आतापर्यंत फक्त दुःखच दिलं आहे”.

आणखी वाचा – “माझ्या ऑटोग्राफसाठी…”, सचिन पिळगांवकर यांनी सांगितला संजीव कुमार यांचा किस्सा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “ऐ डिकरा…”

View this post on Instagram

A post shared by Pratyusha Banerjee (@iamprats)

“प्रत्युषाचे हे स्वतःचे शब्द होते. ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तेव्हा तिला लोक ओळखायचे. तिने जे दुःख सहन केलं आहे ते कोणीच करु शकत नाही. आई-वडिलांना प्रत्युषा भेटू नये म्हणून अनेक लोकांनी तिला अडवून ठेवलं. स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी प्रत्युषाच्या आईने माझ्यावर खोटी केस केली. पण तिची आई माझ्याशी नेहमी चांगलंच बोलायची. प्रत्युषाच्या पालकांवर इतकं कर्ज होतं की, ते ५००० रुपये कार लोनही भरु शकत नव्हते. मीच प्रत्युषाला एका जाहिरातीचं काम दिलं होतं”.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?

“या जाहिरातीमधून तिला अडीच ते तीन लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर तिने एक मॅनेजर ठेवला. दीपिका कक्कर बरोबरही काम केलं. मी तिच्या आयुष्यात येण्यापूर्वीच ती दारु पित होती. तिचे वडीलच तिला दारु पाजायचे. आमचं जेव्हा नातं सुरु झालं तेव्हा मी प्रत्युषाला सांगितलं की, दारु कमी कर. यामुळे पुढे त्रास होऊ शकतो.    मी तर तिला स्पष्ट सांगितलं होतं की, तू माझ्यासमोर दारु पिणं सुरु केलं तर मीही प्यायला सुरुवात करणार. कसं तरी तिला कंट्रोल करणं गरजेचं होतं”. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर खरंच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Kurla to Vengurla film

मालवणी भाषेचा तडका, रंजक प्रेमकथा आणि…; 'कुर्ला टू वेंगुर्ला' या नव्याकोऱ्या चित्रपटाचे पोस्टर समोर, दिसणार दमदार कलाकारांची फौज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.