शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Paaru Serial Update

'पारू' मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?

Paaru Serial Update : सध्या अनेक नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवर दोन नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकतंच या मालिकांची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी उत्सुकताही वाढली आहे. दोन्ही मालिकांच्या समोर आलेल्या प्रोमोवरुन मालिकेचा आशयघन कथानक अगदीच रंजक वाटत आहे. ११ ऑगस्टपासून संध्याकाळी ७:३० वाजता ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या वेळेत ‘पारू’ ही मालिका प्रसारित होते. त्यामुळे पारु मालिका संपणार का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. नेटकरी नव्या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत पारु मालिका संपणार का? असा प्रश्न विचारत होते. परंतु पारु मालिका बंद होईल की, त्या मालिकेची वेळ बदलली जाईल याबाबत अजूनही कोणते अपडेट आलेले नाही. मात्र पारु मालिकेच्या जागी ही नवीन मालिका सुरु केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – अ‍ॅक्शन सीनदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, ओढवलेला वाईट काळ, खुलासा करत म्हणाली, “तीन महिने…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आता तर ‘तारिणी’ ही मालिका सुद्धा ११ ऑगस्टपासून रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तारिणी’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच तिच्यासह या मालिकेत अनेक कलाकार झळकणार आहेत. आता या दोन नव्या मालिकांसाठी नक्की कोणत्या मालिका निरोप घेणार की, मालिकांच्या वेळा बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी वाचा – अहान पांडेचा ‘सैयारा’ पाहताच युवक थिएटरमध्येच ओरडू लागला, स्वतःलाच मारुन घेत बेशुद्ध झाला आणि…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

‘पारू’ मालिकेतही सध्या खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत आदित्य व पारू यांच्या नात्याविषयी मारुतीला समजले आहे. मात्र मारुतीच्या मनाविरुद्ध असलेलं हे नातं असून तो वेळोवेळी या नात्याला तोडण्याचा प्रयत्न करतोय. इतकंच नाहीतर दिशा मारुतीच्या डोक्यात काही ना काही भडकवताना दिसत आहे. तर इकडे आदित्य व पारूच्या नात्याला अहिल्यादेवी मान्यता देणार का?, हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.

Tags: marathi serialmarathi serial updatepaaru serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
sachin pilgaonkar troll

"माझ्या ऑटोग्राफसाठी…", सचिन पिळगांवकर यांनी सांगितला संजीव कुमार यांचा किस्सा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "ऐ डिकरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.