रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या ऑटोग्राफसाठी…”, सचिन पिळगांवकर यांनी सांगितला संजीव कुमार यांचा किस्सा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “ऐ डिकरा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2025 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sachin pilgaonkar troll

"माझ्या ऑटोग्राफसाठी…", सचिन पिळगांवकर यांनी सांगितला संजीव कुमार यांचा किस्सा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, "ऐ डिकरा…"

sachin pilgaonkar troll : मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सचिन यांनी अनेक किस्से त्यांच्या मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. त्यावरुन त्यांना बऱ्याचदा ट्रोलसुद्धा करण्यात येतं. मात्र या ट्रोलिंगला ते कधीही जुमानत नाहीत आणि या ट्रोलिंगवर ते कधीच बोलत नाहीत. बालकलाकार म्हणून सचिन यांनी सिनेविश्वात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले. चित्रपटांमधून त्यांनी एक काळ गाजवला. शिवाय दिग्दर्शनातही सचिन यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली पाहायला मिळाली.

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी ‘हा माझा मार्ग एकला’ चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमाच्या संबंधित एक किस्सा सचिन यांनी ‘रेडिओ सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. हा सिनेमा राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात सचिन पिळगावकर यांनी बालकलाकारची भूमिका साकारली होतो. आणि तेव्हा ते फक्त अवघ्या सात वर्षांचे होते.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिका बंद होणार?, नव्या मालिकांच्या वेळांना प्राधान्य दिल्याने प्रेक्षक संभ्रमात, नक्की काय होणार?

हा किस्सा सांगताना सचिन म्हणाले, “अभिनेते संजीव कुमार हे माझा ‘हा माझा मार्ग एकला’ हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी सहकाऱ्याला माझा पत्ता विचारला. घरी येण्यापूर्वी सांताक्रुझमधील एका स्टेशनरीच्या दुकानात गाडी थांबवली, तेथून ऑटोग्राफ बुक घेतली. संजीव यांनी दरवाजा ठोठावला. माझ्या बाबांनी दरवाजा उघडला तर समोर संजीव कुमार होते. त्यांनी विचारलं सचिन आहे का? त्याला बोलवा. मग मी आलो. त्यांनी मला सांगितलं की, मी आताच तुझा ‘हा माझा मार्ग एकला..’ चित्रपट पाहून आलो आहे”.

आणखी वाचा – अ‍ॅक्शन सीनदरम्यान सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा झालेला गर्भपात, ओढवलेला वाईट काळ, खुलासा करत म्हणाली, “तीन महिने…”

पुढे ते म्हणाले, “मी आतापर्यंत कधीच कोणाचा ऑटोग्राफ घेतलेला नाही. माझ्या आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी घेऊ इच्छितो. त्यांनी माझ्यासमोर वही ठेवली, डायरी ठेवली. मग मी त्यांना ऑटोग्राफ दिली”. सचिन यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सचिन यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “आता संत्या १००० मतांनी पिछाडीवर”, “आता हे नवीन प्रकरण काय आहे”, “ऐ डिकरा…काय पण बोलते…काय पण फेकते”, अशा अनेक कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे.

Tags: marathi actormarathi entertainemnt newssachin pilgaonkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Divya Agarwal on Career

डिवोर्स, प्रेग्नन्सी आणि…; लग्नानंतर करिअरच संपलं?, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक सत्य, म्हणाली, "नजर लागली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.