झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या गाण्याच्या शोद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून मुग्धा व प्रथमेश या दोघांनाही लोकप्रियता मिळाली. मुग्धा व प्रथमेश यांनी एकमेकांसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली.
आपल्या गाण्याने व सुमधुर आवाजाने चर्चेत राहणारी मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच आज गायिका मुग्धा वैशंपायनचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
मुग्धाच्या अनेक गायक-गायिका मित्रमैत्रिणींनी सोशल मीडियाद्वारे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या साऱ्यात एका पोस्टने सर्वांचेच चांगलेच लक्ष वेधून घेतलें आहे. मुग्धाचा नवरा व गायक प्रथमेश लघाटेने मुग्धाला तिच्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसानिमित्त माझ्या खास व्यक्तीला खूप खूप शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल” असं म्हणत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, प्रथमेशने मुग्धाबरोबरचे काही unseen फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये मुग्धा-प्रथमेशचा वेस्टर्न अंदाज पाहायला मिळत आहे. प्रथमेशने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये मुग्धाने टॉप व मोठा स्कर्ट परिधान केला आहे. तर प्रथमेशनेही casual शर्ट-पॅंट परिधान केली आहे. प्रथमेशने मुग्धाबरोबरचे अनेक सेल्फी फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर या फोटोखाली अनेक चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.