सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मृत्यूनेही टेकले हात; भूंकपामुळे हॉस्पिटल हालत असताना नर्सने स्वतःच्या जीवाशी खेळत बालकांना वाचवलं, भयावह व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 5, 2024 | 5:06 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Taiwan earthquake hospital nurses rescuing new born babies video viral on social media

Video : मृत्यूनेही टेकले हात; भूंकपामुळे हॉस्पिटल हालत असताना नर्सने स्वतःच्या जीवाशी खेळत बालकांना वाचवलं, भयावह व्हिडीओ समोर

बुधवार ३ एप्रिल रोजी तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता. तब्बल ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे देशातील कित्येक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भूकंपाची भीषणता एवढी होती, की कित्येक मोठमोठ्या इमारती हा भूकंप सुरु असताना क्षणार्धात जमिनीवर कोसळल्या. हा भूकंप तैवानमधील गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे म्हटले गेले. या भूकंपानंतर शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं.

या भूकंपामध्ये लोक आपला जीव वाचताना दिसले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळाले. अशातच या भूकंपाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका रुग्णालयातील आहे. तैवानमध्ये भूकंप आला असताना रुग्णालयात काय परिस्थिती होती. हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. तसेच या भूकंपाची भीषणताही पाहायला मिळत आहे. हा भूकंप आला असताना रुग्णालयातील नर्सेसनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांचं रक्षण केलं. या प्रसंगाचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – डोक्याला जखम, रक्त वाहत होतं अन्…; कशाचीच पर्वा न करता सिद्धार्थ चांदेकरने पूर्ण केलं नाटक, बेशुद्ध पडेल अशी अवस्था होती पण…

भूकंपाचे धक्के जाणवताच तिथे काम करणाऱ्या नर्स ताबडतोब खोलीत येतात जिथे नवजात बालकांना ठेवले जाते. त्या खोलीत आधीच तीन परिचारिका हजर असून त्या मुलांचे प्राण वाचवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भूकंपाचे धक्के बसताच दुसरी एक परिचारिका धावत धावत येते आणि मुलांना एकत्र आणण्यास मदत करू लागते. भूकंपामुळे संपूर्ण रुग्णालय हालत असताना त्या परिचारिका स्वत:च्याज जीवाची पर्वा न करता त्या बाळांचे जीव वाचवतात. दरम्यान, या भूकंपाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा – गोविंदाची भाची आरती सिंह ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात?, लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय करतो?

अशातच या तीन परिचारिकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडियावर या व्हिडीओमधील तीन परिचारिका महिलांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी “तैवानमध्ये अजूनही मानवता अस्तित्वात आहे. या परिचारिकांचा आदर आहे. खरंच यांनी स्वत:ची पर्वा न करता केलेल्या या कृतीसाठी या सर्व परिचारिका प्रेम व कौतुकास पात्र आहेत” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.  

Tags: Taiwan EarthquakeTaiwan Earthquake Marathi NewsTaiwan Earthquake News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Next Post
nadia khan on bollywood actors

"खान मंडळी आम्हाला घाबरतात म्हणून…", पाकिस्तानी अभिनेत्रीचं मोठं विधान, म्हणाली, "आम्हाला बॉलिवूडमध्ये काम करण्यावर बंदी घातली कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.