शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अस्तिकाचा नागमणी नेत्राच्या हाती लागणार का?, कुटुंबामध्ये आता कोणाचा होणार मृत्यू?, अद्वैतवरच तिचा जीव जडला अन्…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 8, 2024 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi new promo out video viral on social media

अस्तिकाचा नागमणी नेत्राच्या हाती लागणार का?, कुटुंबामध्ये आता कोणाचा होणार मृत्यू?, अद्वैतवरच तिचा जीव जडला अन्...

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेलेकाही दिवस प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाने व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अजूनही खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर नेत्रा-अद्वैतचा प्रवासही यातून पाहायला मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे.

मालिकेत काही दिवसांपूर्वी अस्तिकाची एंट्री झाली आहे. त्यानंतर या मालिकेला वेगळेच वळण लागले. सुरुची अडारकरने या मालिकेत अस्तिकाची भूमिका साकारली असून तिच्याकडे नागमणी असल्याचे दाखवण्यात आले आहे. अशातच आता आस्तिकाला रुपालीचे सत्य माहित झाले असून तिने हे सत्य अद्वैतलादेखील सांगितले आहे. मात्र आता अस्तिका अद्वैतच्याच प्रेमात पडली आहे. मालिकेत अस्तिका अद्वैतच्या प्रेमात पडली असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – डोक्याला जखम, रक्त वाहत होतं अन्…; कशाचीच पर्वा न करता सिद्धार्थ चांदेकरने पूर्ण केलं नाटक, बेशुद्ध पडेल अशी अवस्था होती पण…

या नवीन प्रोमोमध्ये “अस्तिका माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारही करु शकत नाही. मला माझ्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. पण माझ्या जखमांवर कुणी तरी फुंकर मारल्यासारखे मला वाटत आहे. तुमच्या सहवासात मला खूप बरं वाटतं. तू सोबत असलास की, मी सगळं विसरुन जाते. तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो. माझ्या मनावरची जखम घेऊन मी इतके युगे प्रवास करत आहे. पण आज माझा एकांत संपला आहे. आता आपण कायमचे एक होणार आहोत”.  

आणखी वाचा – स्कर्ट, टॉप अन्…; साडी, नथ नव्हे तर प्रथमेश लघाटेने बायकोचे वेस्टर्न लूकमधील फोटो केले शेअर, मुग्धाच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा

२०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या रहस्यमय कथानकाने साऱ्यांना भुरळ घातली आहे. मालिकेत तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, राहुल मेहेंदळे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरत आहे. अशातच नुकताच या मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले आणि यानिमित्ताने सेटवर जंगी सेलिब्रेशनही करण्यात आले होते.

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
actress tanaaz irani

पहिला घटस्फोट, पुन्हा लग्न, डिप्रेशन, तीन मुलं अन्…; आता फक्त रिल्सवरच दिसते 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री, वैवाहिक आयुष्यामध्ये फसली तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.