शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नेरळवरुन ती मला भेटायला आली अन्…”, प्रथमेश परबने पहिल्यांदाच सांगितली त्याची संपूर्ण लव्हस्टोरी,म्हणाला, “मॅसेज केला तरीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 17, 2024 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory

"नेरळवरुन ती मला भेटायला आली अन्…", प्रथमेश परबने पहिल्यांदाच सांगितली त्याची संपूर्ण लव्हस्टोरी,म्हणाला, "मॅसेज केला तरीही…"

मराठी कलाक्षेत्रात आमचं ठरलं म्हणत अनेक मराठमोळ्या कलाकारांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. या पाठोपाठ आणखी एका मराठमोळ्या व प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकाराने रिलेशनशिपमध्ये असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. हा अभिनेता म्हणजे दगडू या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रथमेश परब होय. प्रथमेशने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे दिवशी त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Lovestory)

लवकरच प्रथमेश व क्षितिजा विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या केळवणाचेही अनेक फोटोस सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखे पसरले. यानंतर आता इट्स मज्जा या युट्युब चॅनेलने प्रथमेश व क्षितिजा यांच्या केळवणाचा घाट घातला होता. यावेळी दोघांसह अनेक गप्पा रंगल्या. प्रथमेशच्या आयुष्यात क्षितिजा कशी आली, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली याशिवाय क्षितिजा नेमकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे अशा विविध गप्पा रंगल्या.

आणखी वाचा – लग्नात बायकोला दिलं ५० कोटी रुपयांचं गिफ्ट, आता ‘बिग बॉस १७’मधील बहुचर्चित कपल घटस्फोटाच्या मार्गावर, सासूबाईंशीही पटेना अन्…

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रथमेशने त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली याबाबत खुलासा केला आहे. प्रथमेश म्हणाला, “‘गुंतता हृदय हे’ नावाची एक सीरिज तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केली होती. आणि त्यात खूप सुंदर असं लिखाण तिने केलं होतं. त्याचबरोबर तिचे खूप छान फोटोही त्या पोस्टमध्ये होते. ते पाहून मी तिला इन्स्टाग्रामवर hi, मला तुझी सिरीज आवडली वगैरे असा मॅसेज केला. पण तिने तो मॅसेज पाहिलाच नाही. तीन-चारवेळा मॅसेज करुनही तिने दुर्लक्ष केलं. त्यांनतर मी फेसबुकवरुन मॅसेज केला. तेव्हा तिने मला इन्स्टाग्रामवर थँक्स असा मॅसेज केला. त्यानंतर आमचं बोलणं सुरु झालं” असं तो म्हणाला.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “आम्ही आता वैतागलो आहोत…”, अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्यातील भांडणं बॉलिवूडलाही पटेना, अभिनेत्री म्हणाली “वाईट वाटतं की…”

पुढे प्रथमेश म्हणाला, “मी टाईमपास चित्रपटाचं ठाण्यात शूटिंग करत होतो, तेव्हा आम्ही दोघं पहिल्यांदा भेटलो. ती नेरळवरुन मला भेटायला आली होती. तेव्हा आम्ही बऱ्यापैकी बोलत होतो, भेटल्यावर ती मला म्हणाली आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का? यावर मी तिला मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला चालेल, असं बोललो. तेव्हा तिने मला, तू मला आय लव्ह यु नाही बोलणार का अस विचारलं, मी तेव्हा गमतीत तिला, आय लव्ह यु टू असं बोललो. त्यानंतर बरेचदा मी आय लव्ह यु बोललो आहे”, असंही प्रथमेश म्हणाला.

Tags: entertainmentkshitija ghosalkarmarathi actorprathamesh parabprathamesh parab and kshitija ghosalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Akshay Kumar On Wife

वयाच्या ५०व्या वर्षी पदवीधर झाली ट्विंकल खन्ना, अक्षय कुमार बायकोचं यश पाहून भारावला, म्हणाला, "मी थोडा अभ्यास केला असता तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.