प्रथमेश परबने सोशल मीडियावरुन त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता प्रथमेशने त्याच्या साखरपुड्याची तारीखही जाहीर केली. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रथमेश व क्षितिजा घोसाळकर यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. अशातच प्रथमेश व त्याची होणारी बायको क्षितिजा घोसाळकर लग्नापूर्वीचे त्यांचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांच्या केळवणाचीही जोरदार चर्चा सुरु आहे. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar)
प्रथमेश व क्षितिजा यांचं नुकतंच इट्स मज्जा या युट्युब चॅनेलकडून केळवण पार पडलं. यावेळी प्रथमेश व क्षितिजा यांच्याशी अनेक गप्पाही रंगल्या. यावेळी बोलताना प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने एक सेलिब्रिटी म्हणून प्रथमेशचा मॅसेज आला तेव्हा क्षितिजाची नेमकी काय प्रतिक्रिया होती याबाबत तिने भाष्य केलं. क्षितिजा म्हणाली, “मला पहिल्यांदा मॅसेज आला तेव्हा मी खूप खुश झाले होते. ती सीरिज खूप व्हायरल झाली होती त्यामुळे बऱ्याच जणांनी मॅसेज करून माझं कौतुक केलं. त्यावेळी प्रथमेशचा आलेला मॅसेज हा माझ्यासाठी पहिल्यांदा व्हेरीफाईड अकाउंटवरुन आलेला मॅसेज होता. त्याने मला छान फोटो आहेत, छान लिहिलं आहेस असा मॅसेज केला होता”.
पुढे क्षितिजा म्हणाली, “त्यानंतर आम्ही एक-दोन दिवस मॅसेजवर बोललो. चौथ्या-पाचव्या दिवशी काय करत आहेस?, जेवलीस का? असे मॅसेज येऊ लागले. तेव्हा मला शंका आली की नक्की प्रथमेशच मॅसेज करत आहे की त्याची कोणी टीम आहे जी त्याच सोशल मीडिया सांभाळत आहे. मला ही शंका आल्याने मी मॅसेजला रिप्लाय द्यायचं बंद केलं. तरीही प्रथमेशचे मॅसेज येणं काही थांबलं नाही. तेव्हा मी व्हेरिफिकेशनसाठी त्याच्याकडून त्याचा मोबाईल नंबर मागून घेतला. मग मी त्याला व्हॉट्सअपला मॅसेज केला. तेव्हा मला असं वाटलं की डीपी तर कोणीही ठेवू शकतं. आणि अचानक असा कॉल वगैरे कसा करायचा.
यापुढे ती असंही म्हणाली की, “त्यानंतर मी त्याच्या व्हॉट्सअपच्या मॅसेजकडेही दुर्लक्ष केलं. त्यानंतर आम्ही अधून मधून बोलायचो. एकदा माझ्या एका वेबसीरिजनिमित्त लाईव्ह मुलाखत सुरु होती तेव्हा मला प्रथमेशच्या नावाने व्हिडीओ कॉलचे नोटिफिकेशन येऊ लागले. त्यानंतर माझी मुलाखत झाल्यानंतर मी त्याला कॉलबॅक केला. लॉकडाऊनमध्ये प्रथमेशने नवं घर घेतलं. ते मला त्याला दाखवायचं होतं म्हणून तो मला व्हिडीओ कॉल करत होता. तेव्हा मी पहिल्यांदा प्रथमेशला व्हिडीओ कॉलवर पाहिलं” असं म्हणत तिने त्यांच्या पहिल्या ऑनलाईन भेटीबद्दल सांगितलं.