शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१९ वर्षांचा संसार, १८ वर्षांची लेक अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संसार मोडला, वेगळं राहते पण घटस्फोट घेणार नाही कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 17, 2024 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shubhandi Atre Divorce News

१९ वर्षांचा संसार, १८ वर्षांची लेक अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संसार मोडला, वेगळं राहते पण घटस्फोट घेणार नाही कारण...

‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय हिंदी मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्राने विनोदाची उंची वाढवत मालिकेचं स्थान उंचावलं. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेलं पात्र म्हणजे अंगुरी भाभी. मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शुभांगी अत्रे तिचा पती पियुष पुरेसह वेगळी होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आतापर्यंत या अभिनेत्रीने आपल्या मुलीला या सगळ्यापासून दूर ठेवले असून वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारलेला नाही. समोर आलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने अद्याप घटस्फोट दाखल केलेला नाही. (Shubhandi Atre Divorce News)

शुभांगी अत्रे यांनी २००३ मध्ये इंदूरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या पियुषसह लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी तिने एका मुलीला जन्म दिला. पण गेल्या वर्षी हे दोघे जवळपास वर्षभर एकत्र राहत नसल्याची बातमी आली होती. दरम्यान त्यांच्यातील वादामुळे दोघांनाही वेगळे व्हायचे आहे असं समोर आलं. या जोडप्याने त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिल्याचंही सांगण्यात आलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दोघेही यापुढे एकत्र राहू शकणार नाहीत असा त्यांच्यात करार झाला.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या भांडणात कलाकरांची उडी, सनी लिओनीची अभिनेत्रीला साथ, म्हणाली “मी तुझ्या…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री वेगळी राहत आहे परंतु घटस्फोटाची प्रक्रिया अद्याप त्यांनी केलेली नाही. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, शुभांगी व पियुष वेगळे झाले आहेत. आणि आपापल्या आयुष्यात पुढेही गेले आहेत. पण जेव्हा कायदेशीर औपचारिकता येते तेव्हा ते मागे हटतात. कारण दोघांनाही आपल्या मुलीला या सगळ्या संकटात आणायचे नाही. त्यामुळे जे सुरु आहे ते तसेच सुरु ठेवायचं आहे.

आणखी वाचा – “सर्व सामान्यांना टोल परवडेल का?”, अटल सेतूबाबत व्हिडीओ शेअर करताच अक्षया नाईकला नेटकऱ्याने सुनावलं, म्हणाली, “टॅक्सीमध्ये वेळ…”

शुभांगी अत्रेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘कसौटी जिंदगी की’, ‘कस्तुरी’, ‘चिडिया घर’ यांसारख्या मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारत सर्वांचे मनोरंजन केलं. अभिनेत्री फारशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत नाही. याउलट ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते.

Tags: bhabhiji ghar par haientertainmentshubhangi atreshubhangi atre divorceshubhangi atre husband
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar

"त्याने मला व्हिडीओ कॉल केला अन्…", प्रथमेश परबच्या नात्याला फिल्मी स्टाईलने झाली सुरुवात, होणारी बायको म्हणाली, "दुर्लक्ष केलं पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.