छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून या शोच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेत आहे. घरातील पत्येक स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे घराबाहेरुन अनेकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत. (Sunny Leone Supports Ankita Lokhande)
सोशल मीडियावर अनेक कलाकार मंडळी आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. अंकिता लोखंडे ही या घरातील आकर्षणाचे केंद्रबिंदु असून अनेकजण तिला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे. सनीने अंकितासाठी एक पोस्टही शेअर केली आहे. अंकिताला जिंकण्यासाठी चाहते भरपूर मतदान करत आहेत. अंकिताने हा शो जिंकावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे आणि यात आता सनी लिओनीची भर पडली आहे.
All the best @anky1912 for #BB17 finale ..I am rooting for you girl!! ????
— Sunny Leone (@SunnyLeone) January 16, 2024
.
.#AnkitaLokhande #AnkitalsTheBoss
सनीने अंकिताच्या समर्थनार्थ एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “अंकिता ‘बिग बॉस १७’च्या अंतिम फेरीसाठी तुला खूप शुभेच्छा. मी तुझ्या पाठीशी उभी आहे.” सनी लिओनीच्या या पोस्टवर चाहतेदेखील कमेंट करत आहेत. एका चाहत्याने असे लिहिले आहे की, “होय, विजेती फक्त अंकिता लोखंडेह होणार.” तर आणखी एकाने, “धन्यवाद सनी, अंकिताला पाठिंबा देण्यानिमित्त तुम्ही आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.”
दरम्यान, अंकिता लोखंडे व विकी जैन प्रत्येक एपिसोडमध्ये भांडताना दिसत आहेत. दोघांच्या भांडणांना आता प्रेक्षकही वैतागले आहेत. अशातच आता त्यांच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.