शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘रामायण’मधील राम, लक्ष्मण, सीता अयोध्येमध्ये पोहोचताच घडला चमत्कार, लोक त्यांनाच देव मानू लागले अन्…  

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2024 | 5:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ramayan seial fame arun govil deepika chikhalia and sunil lahri reached at ayodhya ram mandir video viral on social media

Video : ‘रामायण’मधील राम, लक्ष्मण, सीता अयोध्येमध्ये पोहोचताच घडला चमत्कार, लोक त्यांनाच देव मानू लागले अन्...

येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी सहभागी होणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. अशातच रामायण या गाजलेल्या मालिकेतील राम, लक्ष्मण व सीता हेदेखील अयोध्येत पोहोचले आहेत.  

रामायण मालिकेमध्ये श्री रामच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते अरुण गोविल, सीतेच्या भूमिकेत दिसणारी दीपिका चिखलिया व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी हे तिघे राम नगरी अयोध्येमध्ये पोहोचले आहेत. यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीता म्हणजेच अभिनेत्री दीपिका यांनी लाल रंगाची साडी नेसलेली आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे. तर राम-लक्ष्मण म्हणजेच अरुण गोविल व सुनील लहरी हे दोघे पिवळ्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या भांडणात कलाकरांची उडी, सनी लिओनीची अभिनेत्रीला साथ, म्हणाली “मी तुझ्या…”

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये सुनील लहरी यांनी त्यांना प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण न मिळाल्यावर त्यांची नाराजी व्यक्त केली होती. पण आता त्यांना अयोध्या नगरीत पोहोचलेले पाहून चाहतेही खूप खुश झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी पुन्हा एकदा आम्हाला राम-लक्ष्मण-सीता यांचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली आहे तर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये ‘जय श्री राम’ अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.  

हेही वाचा – “स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच…”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला…”

दरम्यान, अयोध्येमधील या राम मंदीर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी क्रिकेट, राजकारण, मनोरंजन यांसह उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे.  

Tags: सुनील लहरीअरुण गोविलमनोरंजन बातमीरामायणबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड अभिनेत्रीदीपिका चिखलियाArun Govilbollywood actorbollywood actressDeepika Chikhaliaentertainment newsRamayanaSunil Lahri
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Marathi actress Sukanya Mone praised her mother in law see the details

“सासूबरोबर भांडणं झाली पण...”, सुकन्या मोनेंनी पहिल्यांदाच सांगितले सासरी कसं होतं वातावरण?, म्हणाल्या “त्यांची व माझी मतं...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.