शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शाहरुख खानचं गाणं अन् हटके स्टेप; साखरपुड्यातील प्रथमेश परबचा डान्स पाहून नातेवाईकही चक्रावले, कौतुक केलं आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 16, 2024 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar

Video : शाहरुख खानचं गाणं अन् हटके स्टेप; साखरपुड्यातील प्रथमेश परबचा डान्स पाहून नातेवाईकही चक्रावले, कौतुक केलं आणि…

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लवकरच एक मराठमोळा लोकप्रिय अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका दगडू प्रथमेश परब. नुकताच शाही थाटामाटात प्रथमेश परबचा साखरपुडा समारंभ संपन्न झाला. जवळचे कुटुंबीय व नातेवाईकझ मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन देत प्रथमेशने साखरपपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar)

प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा उरकला आहे. गेल्या ३ वर्षांपासून प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना डेट करत होते. दोघांनी त्यांच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली होती. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांच्या दोघांच्या लग्नाकडे नजरा लागून राहिल्या होत्या. अशातच आता दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. प्रथमेश व क्षितिजाच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन तुफान व्हायरल होत असून दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – “मोठ्या दीरांनी…”, रवींद्र महाजनींच्या भावानेही छळ केल्याचा गश्मीर महाजनीच्या आईचा गंभीर आरोप, म्हणाल्या, “खूप त्रास दिला आणि…”

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुडा समारंभातील साधेपणाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय त्यांच्या साखरपुड्यात प्रथमेशने केलेला डान्सही साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. यांत अभिनेत्याने शाहरुख खानच्या गाण्यावर ठेका धरत हटके स्टेप्स केल्या. यावेळी क्षितिजानेही प्रथमेशला साथ दिलेली पाहायला मिळाली. दोघांचा हा रोमँटिक डान्स प्रेक्षकांना विशेष भावला आहे.

आणखी वाचा – “लग्नानंतर प्रथमच दर्शनाचा योग आला अन्…”, प्रथमेश-मुग्धाने सांगितला श्री नृसिंहवाडी येथील ‘तो’ अनुभव, म्हणाले, “आयुष्यात पहिल्यांदा…”

साखरपुड्यासाठी अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. कोणताच अवाढव्य खर्च व महागडे कपडे परिधान न करता दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा हा समारंभ उरकला. प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुड्यातील अंगठीच्या खास डिझाइनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. साखरपुड्यातील अंगठीमध्ये दोघांच्या नावांमधील पहिली अक्षर पाहायला मिळत आहेत. दोघांच्या अक्षराने सुरुवात झालेल्या अंगठीच्या या हटके कन्सेप्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Tags: entertainmentmarathi actorprathamesh parab and kshitija ghosalkarPrathamesh Parab And Kshitija Ghosalkar dancePrathamesh Parab And Kshitija Ghosalkar engagementPrathamesh Parab And Kshitija Ghosalkar Ring
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Mangesh Desai Home

Video : इतकं प्रशस्त आणि मोठं आहे मंगेश देसाईंचं नवं घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक, ‘त्या’ गोष्टीने वेधलं सर्वाधिक लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.