गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन हे दोघे त्यांच्या गाण्यांनी जितके लोकप्रिय आहेत, तितकेच ते सोशल मीडियावरील त्यांच्या फोटो व व्हिडीओमुळेदेखील चांगलेच चर्चेत असतात. अशातच गेल्या महिन्यात लग्न केल्यानंतर तर हे दोघे आणखीनच चर्चेत आले आहेत. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.
अशातच गेले काही दिवस मुग्धा व प्रथमेश त्यांच्या कार्यक्रमानिमित्त एकमेकांपासून दूर आहेत आणि यामुळे दोघांना एकमेकांची आठवण येत आहे. या आठवणीनिमित्त दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना मिस करत असल्याचे म्हटले होते. प्रथमेश हा नुकताच इंदोरला गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त गेला होता. तेव्हा त्याने इन्स्टाग्रामवर मुग्धाची आठवण येत असल्याचे म्हटले होते. तर मुग्धाही सध्या अंदमानमध्ये तिच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली असून तीही प्रथमेशला मिस करत असल्याची पोस्ट शेअर केली होती.
अशातच प्रथमेशने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तो मुग्धाच्या बहिणीसह दिसत आहे. प्रथमेशने मुग्धाची बहीण मृदुलला काहीतरी खास सरप्राइज दिले आणि याच निमित्ताने मृदुलने त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत “मेहुण्याकडून खास सरप्राइज” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने या फोटोसह मुग्धाल टॅगदेखील केलं आहे.
प्रथमेशने मृदुलला नक्की काय सरप्राइज दिलं हे माहीत नसले तरी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंदावरुन हे सरप्राइज नक्कीच विशेष असल्याचे भासत आहे. दरम्यान, मुग्धा व मृदुल या दोन बहीणींचे नाते खास असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण प्रथमेशचे ही मुग्धाच्या बहिनीबरोबर विशेष बॉण्ड असल्याचे या फोटोवरुन पाहायला मिळत आहे.