शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुनची मैत्रीण त्याच्याच प्रेमात, प्रेमाची कबुलीही दिली, पुढे अप्पीचं काय होणार?

Saurabh Moreby Saurabh More
मे 23, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector marathi serial update Arya confessed her love for Arjun

अर्जुनची मैत्रीण त्याच्याच प्रेमात, प्रेमाची कबुलीही दिली, पुढे अप्पीचं काय होणार?

झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतली, तेव्हापासून मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्री झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अमोल व अर्जुन एकमेकांना भेटत असले तरी दोघांपैकी कुणालाच त्यांच्या नात्याविषयी माहिती नाही. सात वर्षांपूर्वी अर्जुनने अप्पीला न भेटण्याचे व त्याच्याविषयी अमोलला माहीत न पडू देण्याचे वचन दिले होते आणि तेच वचन अप्पी आता पाळत आहे. अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ पाहत आहे. अर्जुनबरोबर असणारी त्याची मैत्रीण आर्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुनविषयीच्या तिच्या भावना अर्जुनच्या बाबा व वहिनीकडे व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – लेकीच्या लग्नात वडील भावुक, मुग्धा-प्रथमेशने लग्नाला पाच महीने पूर्ण होताच शेअर केला खास व्हिडीओ, पाहा Unseen Moments

यासंबंधित मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून यामुळे कथानकाला एक वेगळेच वळण येणार असल्याचे यावरून कळत आहे. या प्रोमोमध्ये आर्या अर्जुनच्या घरच्यांकडे तिच्या भावना व्यक्त करताना असं म्हणते की, “आज सगळीकडे ओरबडायची वृत्ती पाहायला मिळत आहे. माणसं प्रचंड हावरी झाली आहेत. पण अर्जुन तसा नाहीये. त्याची आणि माझी मैत्री कशी झाली? याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मी त्याच्या प्रेमात पडली आहे. मी ठरवलं होतं की, मी हे कधीच कोणाला बोलणार नाही. पण आज माझ्या तोंडून निघून गेलं.”

आणखी वाचा – विरोचकाच्या वशीकरणामधून राजाध्यक्ष कुटुंब बाहेर, रुपालीची शक्ती संपली, त्रिनयना देवी नेत्रा-इंद्राणीच्या साथीला

यापुढे अर्जुनची वहिनी आर्याला “तू हे आमच्यापासून का लपवणार होतीस?” असं विचारते. यावर आर्या असं म्हणते की, “आजही अर्जुन अपर्णा मॅडमवर प्रेम करतो.” त्यामुळे आता इतके दिवस अप्पी-अर्जुन यांची भेट होण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती आणि अशातच आता आर्या म्हणून या दोघांमध्ये अडथळा आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या दोघांचे नाते आणखी कठोर होणार? की यातून अप्पी-अर्जुन यांच्या नात्याला एक नवीन वळण येणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
kiran rao and amir khan live in relationship

"आई-वडिलांच्या दबावामुळे लग्न केलं अन्…", आमिर खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर किरण रावचा मोठा खुलासा, म्हणाली, "लिव्हइनमध्ये राहिलो तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.