छोट्या पडद्यावरील वादग्रस्त व बहूचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’च्या दरवर्षीच्या अनेक पर्वांप्रमाणे यंदाच्या १७वे पर्वदेखील विसहश गाजले. अशातच बिग बॉसच्या यंदाच्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे अनेक कारणांनी गाजले. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व हे मनोरंजन विश्वातील जोड्यांवर आधारित होतं. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७व्या पर्वात अनेक जोडप्यांनी सहभाग घेतला होता. ५त्यामुळे या जोडप्यांमधील रोजच्या भांडणांचादेखील प्रेक्षकांनी अगदी मनमुराद आनंद घेतला.
अशातच ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्या पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकण्यासाठी घरातील प्रत्येक स्पर्धकाचा चाहता व प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत. त्यांचा आवडता स्पर्धक जिंकावा यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत.
अंकिता लोखंडे ही या घरात आल्यापासूनच मुख्य आकर्षण बनली आहे. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ही अभिनेत्री विविध कारणांनी चर्चेत आहे. अंकिताची या शोमध्ये येण्याआधीच ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली होती. या मालिकेमुळे तिला अमाप लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. त्यांतर या शोमुळेदेखील तिला अमाप लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता व प्रसिद्धी पाहता तिला अनेक स्तरातून तिला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेने देखील अंकिता लोखंडेल पाठींबा देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…
प्रियाने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात तिने असं म्हटलं आहे की, “मी अंकिताला खूप वर्षांपासून ओळखत आहे. मी तिच्या आयुष्याचा प्रवास आणि तिचा संघर्ष फार जवळून पाहिला आहे आणि ती एक संघर्षयोद्धा आहे, यावर माझा विश्वास आहे. तुम्ही सर्वांनीदेखील तिचा ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापर्यंत त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवासही पाहिला आहे. तिच्या या आवडीमुळे व खरेपणामुळे ती इथपर्यंत येऊन पोहोचली आहे.” यापुढे प्रिया असं म्हणाली की, “आज मी तिचे शुभचिंतक, चाहते व प्रेक्षक यांना विनंती करते की, तुमचे तिच्यावरील प्रेम हे मतांद्वारे व्यक्त करा. तिला आता तुमच्या पाठिंब्याची अधिक गरज आहे. त्यामुळे कृपया अंकिताला भरघोस मतं द्या.”
दरम्यन, अंकिताला रश्मी देसाई, राखी सावंत, कंगना रानौत, सनी लिओनी या बॉलिवूड अभिनेत्रींसह अमृता खानविलकर, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे आणि आता प्रिया मराठे या मराठी अभिनेत्रीनेही अंकिताला पाठिंबा दिला आहे