हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट व टीव्ही अभिनेते फिरोज खान यांचे निधनाचे वृत्त समोर येत आहे. अभिनेते फिरोज खान यांनी या जगाचा निरोप घेतला असून आज २३ मे रोजी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आसल्याचे कळत आहे आणि त्यांच्या या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर दु;ख व्यक्त केलं आहे .
फिरोज खान यांनी आजवर अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘भाबीजी घर पर हैं!’, ‘जिजा जी छत पर हैं’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टान पलटन’ आणि ‘शक्तिमान’ यासारख्या मालिकांमध्ये कं करत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप आपल्या प्रेक्षकांवर पाडली आहे. याशिवाय त्यांनी गायक अदनान सामीचे सुपरहिट गाणे ‘थोडी सी तू लिफ्ट करा दे’सह अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते.
शिवाय फिरोज खान हा दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नक्कल खूप चांगल्या प्रकारे करत असे. त्यामुळे अनेक लोक फिरोज खान यांना ‘अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणूनही ओळखत असे. फिरोज खान हे अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये राहत होते आणि इथे राहून ते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भाग घेत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते त्यांचे सादरीकरण प्रेक्षकांसमोर सादर करत असे. फिरोज खान यांनी नुकतंच ४ मे रोजी बदाऊन क्लब येथे मतदार महोत्सवात शेवटचे सादरीकरण केले होते.
आपल्या शेवटच्या परफॉर्मन्समध्ये फिरोज खान यांनी अमिताभ बच्चन यांचे अनेक डायलॉग्स ऐकून लोकांना मतदानासाठी प्रेरित केले होते.. त्यांनी दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांची नक्कल केली होती. अशातच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाकारांसह त्यांच्या अनेक चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.