लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि ही लहान मुलं जेव्हा अतरंगी करामती करतात, तेव्हा त्या करामतीही तितक्याच निरागस असतात. लहान मुलांच्या प्रत्येक करमातीत निरागसता असते आणि ही निरागसता त्यांच्यावर ओरडण्यापासून प्रत्येकालाच परावृत्त करते. अशीच एक करामत क्रांतीच्या लेकीने केली आहे आणि त्यांची ही करामत क्रांतीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
अभिनेत्री क्रांती ही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. क्रांती तिच्या लेकींच्या अनेक करामती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. अशातच तिने तिची मुलगी छबील हिचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात छबीलने कापसाच्या सॉफ्ट टॉयला (खेळणे) आंघोळ घातली आहे. क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये क्रांती असं म्हणते की, “आमच्या छबीलने या सॉफ्ट टॉयला आंघोळ घातली आहे. तिला हे असं करायला आवडतं. त्यामुळे तिने या खेळण्यालादेखील आंघोळ घातली आहे. त्यामुळे हा बाहुला पूर्ण भिजला आहे आणि त्यामुळे हा जड झाला आहे. यादरम्यान ती स्वत:ही ओली होऊन आली आहे.”
यानंतर ती त्या बाहुल्याला उन्हात ठेवायला सांगते. त्यावर छबीलही तो बाहुला घेऊन बाल्कनीत घेऊन येते आणि लसूण वाळत घातलेल्या ठिकाणी तो बाहुला ठेवते आणि “मी याला याच्या (लसूण)च्या बाजुला ठेवते.” असं म्हणते. त्यानंतर टई गोदोचादेखील बाहुला घेऊन येते व तिने भिजवलेल्या बाहुल्याच्या शेजारी ठेवते. यादरम्यान, छबील-गोदो यांचे वडील म्हणजेच समीर वानखेडे हे दोघींना ओरडत असल्याचेदेखील या व्हिडीओमध्ये मिळत आहे.
आणखी वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम ‘या’ कलाकाराची नवीन मालिकेत वर्णी, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
क्रांती शेअर करणाऱ्या प्रत्येक व्हिडीओवर चाहते मंडळी भरभरून प्रतिक्रिया देत असतात. अशातच या व्हिडीओवरदेखील नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये छबील व गोदो यांचे कौतुक केले आहे. हा लहान मुलीचा आवडता छंद असतो dolls ना आंघोळ घालणे आणि स्वतः पाण्यात खेळणे, तुमची छबील ही खूपच मस्तीखोर आहे वाटतं, छबिल जरा उद्योगीच दिसत आहे बाबा, आज या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही दिसलात एवढ्या दिवसात खुप छान वाटलं” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर क्रांतीने बाल्कनीत वाळत घातलेले लसूण पाहून अनेकांनी “तुमच्या इथे पण लसूण गॅलरीमध्ये वाळवतात का?” असं म्हणत कमेंट केली आहे.