बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मोठं अंगण, घराभोवती नारळाची झाडं अन्…; कोकणात इतकं साधं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं घर, पाहा Inside Video

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 23, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhijeet Kelkar Home

Video : मोठं अंगण, घराभोवती नारळाची झाडं अन्…; कोकणात इतकं साधं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं घर, पाहा Inside Video

‘बिग बॉस’मराठीमुळे अभिनेता अभिजीत केळकर चर्चेत आला. अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमधून अभिजीतने महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र अभिजीतला ‘बिग बॉस’ मराठीमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही अभिजीत बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अभिजीत विशेषतः त्याच्या घरातल्यांना वेळ देताना दिसतो. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत तो अपडेट देत असतो. (Abhijeet Kelkar Home)

अभिजीत सध्या त्याच्या कुटुंबासह उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी गेला आहे. काही दिवसांपासून तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गावात फिरतानाचे व्हिडीओ शेअर करत आहे. ज्यामध्ये त्याची मुलं आजीसह रामरक्षा स्त्रोताचे पठन करताना दिसली. शिवाय आणखी एका व्हिडीओमध्ये अभिजीत त्याच्या दोन्ही मुलांसह समुद्रकिनारी धमाल करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “स्वतःचं थोबाड लपवून…”, ‘दाताडी’ म्हणून हिणावणाऱ्याला रोहित राऊतच्या बायकोचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “कसं जमतं…”

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

अभिजीत सध्या आपल्या कुटुंबासह कोकणात सुट्टी एन्जॉय करत आहे. अभिजीतचे हे कोकणातील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये अभिजीतचं कौलारू चिऱ्याचं घर पाहायला मिळत आहे. घराच्या आजूबाजूला नारळासह विविध झाडं दिसत आहेत. तसेच घराबाहेर मोठं अंगण पाहायला मिळाली. अंगणातील तुळसही लक्षवेढी ठरली. तसेच व्हिडीओमध्ये सुंदर असं घर पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – लेकीच्या लग्नात वडील भावुक, मुग्धा-प्रथमेशने लग्नाला पाच महीने पूर्ण होताच शेअर केला खास व्हिडीओ, पाहा Unseen Moments

अभिजीतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये झळकला होता. या मालिकेतील त्याची साहेबराव ही भूमिका विशेष गाजली. याशिवाय अभिजीत ‘कलर्स मराठी’ वरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिकेतही पाहायला मिळाला. अभिनयाबरोबरच अभिजीत राजकारणातही सक्रिय आहे. राजकारणावरही तो नेहमीच आपली मत मांडताना दिसतो.

Tags: Abhijeet Kelkar Homeabhijeet kelkar village homeentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bollywood Actor Firoz Khan passed away due to heart attack and he known as Amitabh Bachchan's duplicate

बिग बी अमिताभ बच्चन यांचे डुप्लीकेट अभिनेता फिरोज खानचे निधन, हृदयविकाराच्या झटक्यामुळे गमावला जीव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.