मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत झळकताना दिसतो. शशांक सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. तो विविध आगामी प्रोजेक्ट्सबाबत नेहमी पोस्ट करताना दिसतो तसेच कामाव्यतिरिक्य तो इतर ही पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यातुन त्याने नागरिकांना वाहतुक नियमांबाबत सतर्क करण्याचं काम केलं आहे. (shashank ketkar shared a post related traffic signal)
सध्या देवींच्या महिमांचा नवरात्र उत्सव चालू आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ विविध रंगांची प्रतिकं आणि देवींच्या नऊ रुपांची पुजा केली जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळा रंग विविध संदेश दर्शवतात. या दिवसांमधील विविध रंगाचे कपडे घालताना दिसतात. कालचा रंग लाल होता. त्यामुळे सर्वजण लाल रंगाचे कपडे परिधान केलेले दिसले. त्याचबरोबर शशांक केतकर याने लाल रंग इन्स्टाग्रामवर अनोख्या अंदाजात पोस्ट केला. त्याने सिग्नलचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टला शशांकने कॅप्शन दित लिहीलं, ‘निदान आज तरी लाल सिग्नलचा आदर करा’.
बऱ्याचदा प्रवास करताना नागरिक वाहतूक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे बरेच अपघात घडताना दिसतात. त्यातील एक नियम म्हणजे लाल रंगाचा सिग्नल म्हणजे ‘थांबा’ असं प्रतित करतो. पण बरेच जण याचा अर्थ माहित असूनही नियमांच उलंघन करताना दिसतात. त्यामुळे कालच्या लाल रंगाचं प्रतिक म्हणून त्याने खास लाल सिग्नलचा फोटो शेअर करत नागरिकांना हे नियम पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
शशांक नुकताच ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. यापूर्वी तो ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’ अशा मालिकांमध्ये दिसला होता. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील शशांकने साकारलेली ‘श्री’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.