हास्यजत्रा हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकार कायमच चर्चेत असतात. त्यांचा अभिनय,विनोदाचं टायमिंग आणि दमदार लेखन या मुळे कलाकार नक्कीच घरोघरी पोहोचले आहेत. त्यातीलच एक जुना कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादच्या अभिनया सोबतच त्याच लिखाण देखील तितकंच प्रगल्भ आहे.या आधी प्रसाद कॉमेडी एक्सप्रेस या शो मध्ये देखील पाहायला मिळाला होता. (Prasad Khandekar)
सध्या रंगभूमीवर प्रसादच कुर्रर्रर्र हे नाटक चांगलच गाजत आहे.प्रसादने या नाटकाचं लेखन,दिग्दर्शन केलं असून तो मुख्य भूमिकेत देखील पाहायला मिळतोय. प्रसाद सोबतच नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ कांबळे अशी तगडी विनोदवीरांची कास्ट नाटकात पहायला मिळते. लग्नानंतर अनेक वर्ष मुलं न होत असणाऱ्या आई ची तळमळ हा या नाटकाचा विषय आहे. संवेदनशील विषय विनोदी टच देऊन हाताळणे ही तशी कसरतच असते. परंतु आपल्या विनोदवीरांना हे अगदी नीट जमलं आहे. हे नाटक पाहिल्या नंतर आपल्या लक्षात येतच.
पहा कोणत्या अभिनेत्रीची प्रसादला पडली भुरळ? (Prasad Khandekar)
सध्या या नाटकाचा अमेरिका दौरा सुरु असून, अमेरिकेतील अनेक गंमतीजंमती हे कलाकाकर त्यांच्या सोशल मीडिया वरून वेळोवेळी शेअर करत आहेत. असाच एक व्हिडिओ प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे.त्यात त्याने अमेरिकेतील युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिली आहे हे एक थीम पार्क आहे. हॉलिवूड अभिनेत्री मॅरिलिन मनरो हिच्या पुतळ्यासोबतचा गंमतीदार असा तो व्हिडिओ आहे. विथ मॅरिलिन मनरो इन युनिव्हर्सल स्टुडिओ. इफ आय एम ए स्टार पीपल मेड मी स्टार- मॅरिलिन मनरो, डे ५ कुर्रर्रर्र अमेरिका दौरा. असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे.त्याच्या या व्हिडिओला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. त्याच सोबत, दादा घरी पण जायचं आहे परत, प्रसाद सर अमेरिकेच्या राजकन्ये सोबत अशा अनेक मजेशीर कमेंट देखील केल्या आहेत. (Prasad Khandekar)
हे देखील पहा : लेकापासून दूर जाताना नम्रता भावुक… लेकासाठी लिहिली खास पोस्ट
नाटकामुळे कलाकार प्रेक्षकांच्या जवळचा होतो. लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तारेवरची कसरत प्रसादला उत्तम जमली आहे. त्याने त्याची दिग्दर्शनाची, अभिनयाची धुरा लीलया पेलली आहे. हे नाटक पाहताना आपल्या लक्षात येतेच.