मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे ही मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते महेश कोठारे याची सून आहे. उर्मिलाने मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केलयं. याचसोबत तिने मराठी चित्रपटात काम करून तिच्या अभिनयाची छाप सोडली. यासोबतच उर्मिला सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. अलीकडेच उर्मिलाने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत. उर्मिलाने एकाच ड्रेस वरचे फोटोज गेले तीन दिवस शेअर केल्यामुळे उर्मिलाला आता ट्रोल हॉट आहे. (Urmilla Kothare Troll)
या फोटोजसाठी उर्मिलाने घागरा चोळी परिधान केली आहे. यावर तिने मोत्याचं नेकपीस घातलं आहे. या लूकमध्ये उर्मिला सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंवर “एकच ड्रेस किती फेमस करणार” तसेच “अंग हे खूप बोरिंग झालाय, नवीन घालत जा ना” असे नेटकऱ्यांनी तिला म्हंटले आहे. याआधी उर्मिला तिच्या आणि आदिनाथच्या घटस्पोटाच्या चर्चेमुळे लोकांच्या नजरेत आली होती. उर्मिलाने आता “तुझेच मी गीत गात आहे” या मालिकेत पुन्हा एंट्री घेतली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता उर्मिला पुन्हा या मालिकेत दिसत आहे.
हे देखील वाचा: हे देखील वाचा: आई गेल्यानंतर ती माझी धाकटी बहीण असून..बहिणींसाठी मिलिंद गवळींची खास पोस्ट=
उर्मिलाला नृत्याची आवड असून ती अनेक नृत्य प्रकार शिकली आहे. नृत्याची कला अवगत असल्यामुळे उर्मिला अनेक स्टेज शो करते तसेच उर्मिलाने अनेक पुरस्कार सोहळ्यात नृत्य सादर केले आहे. याच बरोबर उर्मिला तिच्या नृत्याचे व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर देखील शेअर करत असते. तिने गुडीपाडवा निमित्त
एक रील शेअर केली होती. त्या व्हिडिओमध्ये उर्मिलाने श्री रामाचे वर्णन करणारे नृत्य शेअर केले होते. (Urmilla Kothare Troll)
उर्मिला हिची मैत्री प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत असून, या दोघी एकमेकांसोबत छान बॉण्ड शेअर करतात. उर्मिला आणि क्रांती नेहमी सोबत असताना रील देखील बनवताना दिसतात. तसेच उर्मिला तिच्या लेकीसोबतचे रील सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच त्या दोघी सोबत अनेक फोटोशूट देखील करताना दिसतात.