शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला घेऊन प्रसाद खांडेकरचा नवा चित्रपट, स्वप्निल जोशी व प्रार्थना बेहेरेही महत्त्वाच्या भूमिकेत

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
prasad khandekar directorial next new movie is coming soon video shared on social media

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला घेऊन प्रसाद खांडेकरचा नवा चित्रपट, स्वप्निल जोशी व प्रार्थना बेहरेही महत्त्वाच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरात पहिला जाणारा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक. हास्यजत्रातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं असून यांमुळे अनेक कलाकार आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. याच कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेला कलाकार म्हणजेच प्रसाद खांडेकर. एकांकिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रसादने हास्यजत्रेसह अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलेलं असून अभिनयाबरोबर त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शनदेखील केले आहे. नाटकांचे दिग्दर्शन केल्यानंट तो चित्रपटांच्या दिग्दर्शनाकडे वळला आहे. (Swapnil Joshi On Instagram)

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन स्वत: प्रसादनेच केले होते. तर अभिनेते सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, भाऊ कदम, ओंकार भोजने, रोहित माने, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळाली होती. अशातच आता प्रसाद दिग्दर्शक म्हणून त्याचा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. अभिनेता स्वप्नील जोशने त्याच्या सोशल मीडियाद्वारे प्रसादच्या या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)

आणखी वाचा – “दोन वेगळ्या कंपनीचे सेम प्रॉडक्ट अन्…”, स्वतःच्या पतीचा गौतमीच्या नवऱ्यासह फोटो पोस्ट करत मृण्मयीची गंमतीशीर कमेंट

स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एकामागोमाग एक कलाकार येत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखील रत्नपारखी, प्रियदर्शिनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बडदे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे व श्लोक प्रसाद खांडेकर आदि कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. स्वप्नीलने हा खास व्हिडीओ शेअर करत “तर हा व्हिडीओ बनवायचं कारण म्हणजे.. आता आम्ही काय सांगणार ना, हा व्हिडीओ बघा म्हणजे तुम्हाला कारण समजेल” असं म्हटलं आहे. नवीन मराठी चित्रपट, शूटिंगला सुरुवात असे हॅशटॅगदेखील लिहिले आहेत.

आणखी वाचा – आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण?, करतो ‘हे’ काम, बड्या सेलिब्रिटींशी खास नातं अन्…

या चित्रपटाचे लेखन हास्यजत्रेमधीलच आणखी एक लेखक प्रथमेश शिवलकरने केले आहे. तर प्रसादनेही या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली तेजस्विनी पंडित, समिधा गुरु, नंदिता पाटकर यांसह अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओखाली कमेंट्स करत या नवीन चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच या चित्रपटासाठी शुभेच्छादेखील दिल्या आहेत.   .  

Tags: Aishwarya Baddechetna bhatentertainment newsmarathi movieMarathi newsnamrata sambheraonew movienikhil banenikhil ratnaparkhiOmkar Rautprabhakar moreprajakta maliprasad khandekarprathana beherepriyadarshini indalkarrohit manesachin goswamishyam rajputswapnil joshivanita kharat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
taarak mehta ka ooltah chashmah

‘तारक मेहता...’मधील सोनू लवकरच विवाहबंधनात अडकणार, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलने लग्नाची मागणी घालताच रडू लागली अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.