बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील सोनू लवकरच विवाहबंधनात अडकणार, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलने लग्नाची मागणी घालताच रडू लागली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 3, 2024 | 5:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
taarak mehta ka ooltah chashmah

taarak mehta ka ooltah chashmah

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेने आजवर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल, भिडे, तारक मेहता, पोपटलाल यांसारखे अनेक पात्रांनी सगळ्यांच्याच मनावर जादू केली. यामधीलच एक नावाजलेलं पात्र म्हणजे आत्माराम भिडेची मुलगी सोनू. या मालिकेत सोनूचं पात्र अभिनेत्री झील मेहताने साकारलं होतं. आता छोटी सोनू म्हणजेच झील खऱ्या आयुष्यात विवाहबंधनात अडकणार आहे. (Jheel Mehta Wedding)

सोनू या पात्राने झील मेहताला प्रसिद्धी मिळवून दिली. तिचं काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता झील तिच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. सध्या तिचा तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. झीलला तिच्या बॉयफ्रेंडने अगदी फिल्मी स्टाइल प्रपोज केलं. तिनेच हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

आणखी वाचा – “दोन वेगळ्या कंपनीचे सेम प्रॉडक्ट अन्…”, स्वतःच्या पतीचा गौतमीच्या नवऱ्यासह फोटो पोस्ट करत मृण्मयीची गंमतीशीर कमेंट

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झीलच्या बॉयफ्रेंडने तिच्यासमोरच अगदी फिल्मी स्टाइल डान्स केला. त्यानंतर तिला प्रपोज केलं. सरप्राइज पाहून आणि बॉयफ्रेंडने लग्नाची मागणी घातली आहे हे पाहून झील रडू लागली. त्यानंतर दोघांनी धमाल पार्टीही केली. व्हिडीओ शेअर करत झीलने म्हटलं की, “कोई मिल गया मेरा दिल गया”. चाहते झीलवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा – ना हातावर मेहंदी, ना भरजरी ड्रेस; लग्नाच्या दिवशीच सलॉनमध्ये गेली आमिर खानची लेक, घरचेच कपडे पाहून भडकले नेटकरी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये उत्तम काम करत झीलने प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. काही वर्ष काम केल्यानंतर तिने अर्ध्यावरच ही मालिका सोडली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने या मालिकेमधून काढता पाय घेतला. पण या मालिकेनंतर ती इतर कोणत्याच मालिका किंवा चित्रपटामध्ये दिसली नाही. तरीही झीलवर आजही प्रेक्षक प्रेम करतात. तिचे सोशल मीडियावर तीन लाखच्या घरात फॉलोवर्स आहेत.

Tags: bollywood newsentertainment newsTaarak mehata ka ooltah chashamah
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
bigg boss 17 ankita lokhande will take the decision of divorce from husband vicky jain actress gives hints

Bigg Boss 17 : "शोमधून बाहेर आल्यानंतर...", अंकिता लोखंडे विकी जैनबरोबर घटस्फोटाचा निर्णय घेणार?, म्हणाली, "मी निर्णय घेईन तेव्हा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.