फ्रेशर्स या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. मालिका व नाटकांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. यानंतर अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. यात तिचे प्रसाद जवादेबरोबर सुर जुळले. या जोडीने ‘बिग बॉस’ मराठीमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा मिळवली. ‘बिग बॉस’चा हा सिझन गाजवल्यानंतर घरातून बाहेर पडून त्यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी लवकरच लग्न करणार असल्याचं सांगत चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. अमृता-प्रसाद सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. (Prasad Jawade wished Amruta Deshmukh)
अशातच आज अमृता देशमुखचा वाढदिवस आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अमृताबरोबरचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने अमृताला किसही केला आहे. शिवाय मोठी पोस्ट लिहीत त्याने अमृताचे कौतुक केलं आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “तू मला उठवणं, तुझ्यासाठी कॉफी बनवणं, कामावर जाण्याआधी गुड बाय किस देणं, कामावरुन तुला फोन करणं, कामावरुन येताच परत घरी तुला भेटणं, ते एक फूल आणणं, एकत्र जेवण करणं… मुळात प्रत्येक गोष्ट तुझ्यासह करायची आहे, फक्त तू आणि तू”.

आणखी वाचा – जपनाम सुरु करा, बाबा निराला आले! ‘आश्रम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला, काय असेल कथा?
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या प्रिय मैत्रीणी, प्रियसी आणि पत्नी तुझ्यासाठी माझे आयुष्य ऋणी आहे! ३१ जानेवारी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, अमृता देशमुख तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तसंच अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”
दरम्यान, अनेक मालिकांमधून दिसणारी अमृता देशमुख सध्या तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. अमृता देशमुख सध्या संकर्षण कऱ्हाडेबरोबर ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग महाराष्ट्रभर सुरु आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर प्रसाद झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.