ओटीटी विश्वातील काही लोकप्रिय सीरिजमधील एक सीरिज म्हणजे ‘आश्रम’. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन्स आले आहेत. तेव्हापासून अनेकजण या सीरिजच्या तिसऱ्या भागाची वाट बघत होते आणि अशातच आज तिसऱ्या भागाची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘आश्रम ३’चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात पुन्हा एकदा बाबा निरालाच्या भूमिकेत बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये बाबा निराला सडपातळ आणि भयानक भूमिकेत दिसत आहेत. जो महिलांना स्वतःच्या वासनेचा शिकार बनवतो. पण अखेर त्याचं सत्य सर्वांसमोर येतं. नवीन टीझरमध्ये बाबा निरालाची नजर एका नवीन महिलेवर आहे, परंतु शेवटी ती शिकार त्यांच्यासाठी खूप कठीण असू शकते. (Aashram series season 3 part 2)
निराला बाबाचं सत्य समोर येण्यासाठी रचलेला कट आणि गोळीबार… यामुळे कथेला वेगळं वळण मिळणार आहे. टीझरमध्ये बाबा निरालाचे दुष्ट रूप दिसत आहे, भरपूर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि कटाचे जाळेही विणलेले दिसत आहे, एकूणच टीझर जबरदस्त आहे आणि तो पाहिल्यानंतर चाहते सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रकाश राज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या मालिकेचा नवा भाग न्याय आणि बदला या कथेवर आधारित असेल. एमएक्स प्लेअरने या टीझरमधील कथा आणि पात्रांबद्दल सूचना दिल्या आहेत.
‘आश्रम’च्या मागच्या सीझनमध्ये आपण पाहिले की बाबा आपल्या शक्तीचा वापर करून न्यायालयीन केस पूर्णपणे उलथवून टाकतात. पम्मीवर गुन्हा दाखल करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पम्मी तुरुंगात असताना रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईचे निधन झाले. पम्मी तुरुंगातून सुटून बाबा निराला यांच्या आश्रमात पोहोचते. इथे तिचे स्वागत झाले पण आता पम्मीने बाबा निरालाचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे.
आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”
‘आश्रम’चा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्याचा दुसरा सीझन ‘आश्रम चॅप्टर २: द डार्क साइड’ देखील नोव्हेंबर २०२० मध्ये रिलीज झाला. यानंतर २०२२ मध्ये ‘आश्रम’च्या तिसऱ्या सीझनचा पहिला भाग रिलीज झाला, त्यानंतर चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.