लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा आज म्हणजेच ३१ जानेवारी रोजी वाढदिवस आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोबतच आपल्या मधुर हास्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून तिने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. या मालिकेतील गौरी आणि शिवची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली. या मालिकेतूनच सायलीला खरी ओळख मिळाली. सायली संजीव आणि तिचे वडिलांवरील प्रेम सर्वांनाच माहित आहे. अभिनेत्रीने वडिलांच्या आठवणीत स्वत:च्या हातावर टॅटूही काढला आहे. अशातच वाढदिवसानिमित्त तिने वडिलांचे स्मरण केलं आहे. (sayali sanjeev birthday)
सायली संजीव सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलंच प्रेम मिळत असतं. अशातच अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त एक खास फोटो शेअर केला आहे. वाढदिवशी वडिलांच्या स्मरणात सायलीने त्यांचा फोटो हातात घेतला आहे आणि “मिस यू” असं म्हटलं आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या समोर केक पाहायला मिळत आहे. याशिवाय हातात फुलांचे पुष्पगुच्छही दिसत आहे.

अभिनेत्री वडिलांच्या फोटोकडे अगदी प्रेमाने पाहत आहे. तिचा वाढदिवस अगदी साध्यापणाने साजरा झाला असून यावेळी ती काहीशी भावुक झाल्याचेही पाहायला मिळत आहे. बाबांच्या फोटोसोबत तिने केक कट केला. वाढदिवसानिमित्त अभिनेत्री सायली संजीववर आज शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तिला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सायली संजीवने वडिलांच्या जाण्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. अधून मधून ती वडिलांसोबतच्या आठवणी शेअर करत असते.
आणखी वाचा – अधिपती-अक्षरा यांच्यामध्ये गैरसमज वाढला, नात्यामध्ये त्या व्यक्तीमुळे संशय, भुवनेश्वरीला आनंद
दरम्यान, सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली. यानंतर ती ‘शुभमंगल ऑनलाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेचंही प्रचंड कौतुक झालं. तसंच गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या सुपरहिट चित्रपटात देखील ती दिसली.