‘झी गौरव पुरस्कार’ हे कलाकारांसाठी कायमच मानाचे पुरस्कार मानण्यात येतात. प्रेक्षकांकडून कलाकारांच्या कामाचा गौरव म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अशातच नुकताच ‘झी गौरव पुरस्कार’ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी मनोरंजन सृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकार मंडळींना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आले. यात चित्रपट क्षेत्रासंबंधित कलाकारांना ‘चित्र गौरव’ तर नाट्यसृष्टीतील कलाकारांना ‘नाट्य गौरव’ पुरस्कार देण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अमृता देशमुखला व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर हा पुरस्कार मिळाल्यानिमित्त आनंद व्यक्त केला होता. मात्र तिच्यापेक्षाही अमृताच्या नवऱ्याला म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेला बायकोला पुरस्कार मिळाल्याचा आनंद अधिक झाला होता. यावेळी त्याने अमृताचे कौतुक करत एक खास व्हिडीओदेखील शेअर केला होता. अशातच आता प्रसादने पुन्हा एकदा त्याच्या बायकोसाठी गौरवोद्गार काढले आहेत.
नुकतंच ‘इट्स मज्जा’सह साधलेल्या खास संवादात प्रसादने तिच्याविषयी असं म्हटलं की, “मला आधीपासूनच माहीत होतं की, अमृताला हा पुरस्कार मिळणार आहे. मी व माझ्या सासूबाई म्हणजेच अमृताची आई आम्हा दोघांना खात्री होती की हा पुरस्कार अमृतालाच मिळणार. अर्थात या पुरस्कारासाठी इतर अनेक कलाकारांचीही स्पर्धा होती. त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. ज्या दिवशी अमृताला हा पुरस्कार मिळाला. तेव्हा मी साताऱ्यात होतो आणि तिला पुरस्कार मिळताच मी तिथे नाचू लागलो.”
यापुढे त्याने या पुरस्कारासाठी अमृताला खास गिफ्ट देण्याविषयीही असं म्हटलं की, “तिला झी नाट्य गौरवमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला यानिमित्ताने तिला मी खास गिफ्ट देणार आहे आणि ते गिफ्ट काय असणार याविषयी मी लवकरच सांगेन. तसेच मी ‘चला हवा येऊ द्या’मध्येही खास सादरीकरण करणार आहे. त्यामुळे हेही तिच्यासाठी एक गिफ्टच असणार आहे.”
दरम्यान, प्रसाद जवादे या सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘पारू’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकतीच सुरु झालेली ही मालिका सर्वांना आवडत असून या मालिकेतील प्रसादची भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.