शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बायकोचे भलतेच लाड करतो प्रसाद जवादे, मेकअपला बसल्यावर तोंडासमोर पकडला फॅन अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Jawade and Amruta Deshmukh's Gudipadwa special photo shoot behind-the-scenes video

Video : बायकोचे भलतेच लाड करतो प्रसाद जवादे, मेकअपला बसल्यावर तोंडासमोर पकडला फॅन अन्...; व्हिडीओ व्हायरल

नुकतीच हिंदू नववर्षाची सुरुवात झाली असून गुढीपाडवा हा सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला. ठिकठिकाणी मोठ्या शोभायात्रा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे पाहायला मिळाले. मराठी मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास होता. प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर, प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके, पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण, पियुष रानडे व सुरुची अडारकर या कलाकारांसह अमृता देशमुख व प्रसाद जवादे या कलाकारांचा यंदाचा हा पहिलाच गुढीपाडवा होता.

आपल्या पहिल्या गुढीपाडव्यानिमित्त सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावर खास पारंपरिक अंदाजातले फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रसाद व अमृता यांनीही त्यांचे हटके फोटो शेअर करत गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. अशातच त्यांनी या गुढीपाडवा स्पेशल फोटोशूटचे पडद्यामागचे काही खास क्षण शेअर केले आहेत. स्वाती घोडके या मेकअप आर्टिस्टच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये प्रसाद-अमृताचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Swati Ghodke | MUA (@swatighodke_mua_official)

आणखी वाचा – गोठवणारी थंडी, पाणी टंचाई, वीज पुरवठा आणि…; ध्यान व मनःशांतीसाठी हिमाचल प्रदेशला गेली होती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “आयुष्यात…”

या व्हिडीओमध्ये अमृता तयार होत असताना प्रसाद तिची काळजी घेतानाचे पाहायला मिळत आहे. तिला छोट्या पंख्याने हवा देत आहे. त्याचबरोबर ती तयार होत असताना तिच्याकडे एकटक प्रेमाने बघत आहे आणि तिचे लाडही करत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये प्रसाद-अमृताची गुढीपाडवा स्पेशल फोटोशूटच्या आधीची तयारी करतानाचे व त्यानंतर ते गुढीपाडव्याच्या खास लुकमध्ये तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने खरेदी केली लाखो रुपयांची कार, आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “अट्टाहास केला…”

या व्हिडीओवर ‘प्रसाद-अमृता यांची पडद्यामागची धमाल मजामस्ती’ असं लिहिण्यात आले असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “पडद्यावरील सुंदर जोडीचे पडद्यामागील काही खास क्षण” असं म्हटलं आहे. दरम्यान, प्रसाद-अमृताच्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी प्रसादच्या या प्रेमळ वागणुकीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी प्रसाद-अमृताच्या या पारंपरिक लुकचेदेखील कौतुक केले आहे.

Tags: amruta deshmukhmarathi entertainment newsprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Prathamesh Parab And kshitija Ghosalkar

बायकोकडून लाड करुन घेत आहे प्रथमेश परब, क्षितिजाने केली डोक्याला तेल मालिश अन्…; म्हणाला, "लग्नानंतरचं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.