शनिवार, ऑगस्ट 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोकडून लाड करुन घेत आहे प्रथमेश परब, क्षितिजाने केली डोक्याला तेल मालिश अन्…; म्हणाला, “लग्नानंतरचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prathamesh Parab And kshitija Ghosalkar

बायकोकडून लाड करुन घेत आहे प्रथमेश परब, क्षितिजाने केली डोक्याला तेल मालिश अन्…; म्हणाला, "लग्नानंतरचं…"

अभिनेता प्रथमेश परबने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. विनोदी अभिनय शैलीने प्रथमेशने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. अनेक चित्रपटांमधून प्रथमेश नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. काही दिवसांपूर्वी प्रथमेश त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलेला पाहायला मिळाला. प्रथमेशच्या शाही विवाहसोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. प्रथमेशने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह लग्न केले. २४ फेब्रुवारी रोजी प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. (Prathamesh Parab And kshitija Ghosalkar)

अगदी थाटामाटात व पारंपरिक अंदाजात दोघांनी लग्नगाठ बांधलेली पाहायला मिळाली. प्रथमेश व क्षितिजा यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ही प्रथमेश व क्षितिजा बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच ते काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी क्षितिजासाठी तिच्या सासूने बनवलेल्या पाणीपुरी बेतचा खास फोटो पोस्ट केला होता. यावेळी तिने सासूच भरभरुन कौतुक केलेलं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – Video : बायकोचे भलतेच लाड करतो प्रसाद जवादे, मेकअपला बसल्यावर तोंडासमोर पकडला फॅन अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

यानंतर आता प्रथमेशने त्याच्या बायकोबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रथमेशची बायको क्षितिजा त्याचे लाड पुरवताना दिसत आहे. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढत दोघेही एकमेकांना वेळ देताना दिसतात. प्रथमेशची बायको त्याच्या डोक्याला मालिश करतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. लग्नानंतरचं सुख असं कॅप्शन देत त्यांने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि या पोस्टला “सुख म्हणजे नक्की हे असतं”, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.

आणखी वाचा – Lata Mangeshkar Award 2024 : अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहिर, ए.आर. रहमान, अशोक सराफ यांचाही होणार खास सन्मान

क्षितिजा लग्नानंतर परबांच्या घरी रमलेली पाहायला मिळाली. सासरच्या घरातील अनेक व्हिडीओ, फोटो ती वेळोवेळी शेअर करताना दिसते. क्षितिजानं त्यांच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण होताच एक खास स्टोरी पोस्ट केली होती यामध्ये तिने लिहिलं होतं की, ” “डेट अँड डिनर. साखरपुडानंतरचा दुसरा महिना. १४ एप्रिल. एका घरात राहून सुद्धा जेव्हा शूट, नाईट शिफ्ट व ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही आणि तरीही वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जून साजरे करता”, असं म्हटलं. यावरुन दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत एकमेकांना वेळ देताना दिसत आहेत.

Tags: entertainmentkshitija ghosalkarprathamesh parabprathamesh parab and kshitija ghosalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Paaru serial Update

किर्लोस्करांनी घेतली पारूच्या लग्नाची जबाबदारी, अहिल्यादेवींचा मोठा आधार, प्रीतम-दिशाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.