महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकापेक्षा एक आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर हा विनोदाच अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतो. तर हास्यजत्रेतील चेतना भटही तिच्या विनोदी शैलीमुळे विशेष पसंतीस पडते. हास्यजत्रेतील हे कलाकार नेहमीच काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. (chetana bhat prasad khandekar)
तर संपूर्ण हास्यजत्रा ही स्वतःच्या तालावर नाचविणारे वा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे सचिन गोस्वामी. अचूक विनोदाचं टायमिंग कस जुळवून आणायचं याचे धडे देणारे हास्यजत्रेचे दिग्दर्शक म्हणजे सचिन गोस्वामी. साऱ्या कलाकारांच्या वरचढ ते आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. हास्यजत्रेनं प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. या शो मधील सर्वच पात्र हे चाहत्यांना आपलीशी वाटतात. या सर्व स्किट्स सादरीकरण करण्यामध्ये अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात.
पहा प्रसाद – चेतना का थिरकले (chetana bhat prasad khandekar)
नुकताच प्रसाद खांडेकर, चेतना भट आणि सचिन गोस्वामी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्कीटदरम्यान धमाल करतानाचा हा व्हिडीओ आहे. सचिन गोस्वामी यांनी स्कीटच्या प्रॅक्टिस दरम्यान मिळालेल्या ब्रेकमध्ये सचिन गोस्वामी गाणं गात आहेत.

‘अजिब दास्तां है ये’ हे गाणं सचिन गोस्वामी गात असून त्यांच्या या सुमधुर गायनाला प्रसाद आणि चेतना यांनी थिरकून चारचाँद लावलेत. प्रसाद आणि चेतना यांचा हा डान्स व्हिडीओ चेतनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. आणि स्किटच्यामध्ये सरांनी गायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आवाजाची जादू ऐकून नाचण्याचा मोह आवरला नाही असे कॅप्शन देत तिने प्रसादाला ही पोस्ट टॅग केली आहे. (chetana bhat prasad khandekar)
====
हे देखील वाचा – जयदीपच्या आईच्या भूमिकेत अतिषाची धमाकेदार एन्ट्री
====
हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारच खूप क्रिएटिव्ह आहे. सेटवर असताना आणि सेटबाहेरही हे कलाकार नेहमीच धुमाकूळ घालत असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करतोय. टेन्शनवरची मात्रा म्हणजे हास्यजत्रा असे म्हणणाऱ्या हास्यजत्रेने अक्षरशः लोकांना भुरळ पाडलीय. आज प्रत्येकाच्या घरात हा कार्यक्रम आवर्जून पाहिला जातो. या कार्यक्रमाशिवाय रात्रीच्या जेवणातला घास कोणाला उतरत नाही असं म्हणणं ही वावगं ठरणार नाही.
