छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आल्या आहेत. या मालिकांनी प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनात मनोरंजनाची एक वेगळी मेजवानी सादर करत रंगत निर्माण केली आहे. अनेक वाहिन्यांमार्फत प्रदर्शित केल्या जाणाऱ्या मालिका या मोठ्या प्रमाणात पाहिल्या जातात.
मालिकांच्या या शर्यतीत आघाडीची मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे.विशेष करून मालिकेतील जयदीप गौरी या जोडीला भरभरून प्रेम मिळत आहे. (atisha naik entry)
प्रत्येक मालिकेतील जोडी ही नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करते पण या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतील नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या पात्रांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी आणि अभिनेत्री भक्ती ही जोडी सुद्दा चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. कोणतंही कथानक हिट ठरण्यासाठी चांगल्या सकारात्मक भूमिकांसोबतच आवश्यकता असते ती चांगल्या नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची.
पहा मंगलची धमाकेदार एन्ट्री (atisha naik entry)
सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेत जयदीप गौरीच्या खेळीचा शालिनी कडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तर जयदीप कडे असलेल्या पुराव्यांचा आधार घेत जयदीप गौरी शालिनीला जेल मध्ये पाठवण्याच्या तयारीत आहेत. तर आता शालिनीच पात्र या मालिकेतून निरोप घेणार का या संभ्रमात प्रेक्षक दिसत आहेत. पण अशातच सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत एका नव्या खलनायिकेची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. खास करून नकारात्मक भूमिकांसाठी ओळखली जाणारी एक हटके अभिनेत्री अतिषा नाईक या अभिनेत्रीची सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत एन्ट्री होणार आहे.
====
हे देखील वाचा – अरुंधतीच्या हनीमूनचा प्लॅन ऐकून अनिरुद्धचा राग अनावर संजनाला सुनावले खडेबोल
====
मंगल हे अतिषा साकारणार असलेल्या पात्राचं नाव असल्याचं समोर आलं आहे. मंगल हे पात्र म्हणजे जयदीपची आई. आता मालिकेत जयदीपच्या आईची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. जयदीपची आई गौरी आणि जयदीपला साथ देऊन शालिनीचा पडशा पाडणार का हे पाहून रंजक ठरेल. तर नकारात्मक भूमिकांमध्ये आता कोण सरस ठरतंय हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. (atisha naik entry)
अतिषा नाईक यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. आणि त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.