सोशल मीडिया हा आजच्या युगातल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. सोशल मीडियाच्या जा जगात अगदी कुठलीही गोष्ट लगेच ट्रेंडिंग होते. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे सोशल मीडियाच्या या जगात कोणतीही गोष्ट अगदी पटकन ट्रेंड होते आणि त्यापैकीच एक म्हणजे सध्याचं तुफान गाजणारं गाणं ‘गुलाबी साडी’. संजू राठोडच्या या गाण्याने अगदी बॉलिवूडपासून ते मराठी मनोरंजन विश्वाला वेड लावले आहे.
बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षित असून ते डान्सर रेमो डिसूझा यांनीही या गाण्यावर ठेका धरला आहे. त्याचबरोबर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या गाण्यावर डान्स करत हा ट्रेंड फॉलो केला आहे. अशातच आता यात आणखी एका जोडप्याची भर पडली आहे आणि हे जोडपे म्हणजे प्रसाद ओक व मंजिरी ओक. प्रसाद-मंजिरी ही जोडी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ही जोडी प्रत्येक ट्रेंड तर फॉलो करतातच, पण त्यातही ते आपले नावीन्य शोधून काढतात.
प्रसाद-मंजिरी यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात मंजिरी ओक या ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर डान्स करत आहेत. पण त्यांनी गुलाबी साडी किंवा गुलाबी ड्रेस असं काहीही परिधान केलेलं नाही. तर त्यांनी काळ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केलेला आहे. इतक्यात प्रसाद ओक हातात गुलाबी रंगाची बॅग घेऊन येतात आणि ते मंजिरी यांच्या ड्रेसकडे इशारा करुन हे गुलाबी नसून माझी बॅग गुलाबी असल्याचे म्हणतात आणि निघून जातात.
आणखी वाचा – मेष, कन्या व कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे भाग्यशाली, कुणाच्या नशिबात काय असणार?, जाणून घ्या…
दरम्यान, या व्हिडीओमध्ये प्रसाद-मंजिरी यांची केमिस्ट्री हास्यास्पद आहे. तसेच मंजिरी यांनी या व्हिडीओखाली “फक्त गुलाबीवर का चिडला हा? साडी तरी कुठे गुलाबी आहे?” असंही म्हटलं आहे. प्रसाद-मंजिरी यांच्या या मजेशीर रील व्हिडीओला चाहत्यांनी मराठी कलाकारांनीही लाइक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अमृता खानविलकर, मेघा धाडे, दीप्ती देवी, मंजिरी भावे, नम्रता संभेराव अशा अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.