बॉलीवूडमधील सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. २०२३ मध्ये रणबीरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि रणबीर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने भाव खाऊन गेला. ‘अॅनिमल’सह रणबीर आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे ते म्हणजे मुलगी ‘राहा’साठी. रणबीरच्या मुलीचा पहिला फोटो सोशलमीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्याच जगभरातून कौतुक देखील केलं गेलं. रणबीरने कुटुंबासह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात रणबीरने अनेक जुन्या आठवणी शेअर केल्या. (Rishi Kapoor Slaps Ranbir Kapoor)
रणबीर ने शेअर केलेल्या आठवणींमदधील एक आठवण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. रणबीरने सांगितलं कि त्याला एकदा ऋषी कपूर यांनी सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. सविस्तर किस्सा सांगताना रणबीर म्हणाला,”मला आठवतंय वडिलांनी एकदाच मला खूप जोरात मारलं होतं. माझ्या वडिलांची देवावर खूप श्रद्धा होती. मला आठवतंय त्यावेळी आम्ही सगळे दिवाळीच्या पूजेसाठी आरके स्टुडिओजमध्ये जमलो होतो. मी त्यावेळी आठ-नऊ वर्षांचा असेल आणि त्यावेळी तिथे मी चप्पल घालून गेलो तेव्हा वडिलांना मला जोरात कानाखाली मारली होती”.
आणखी वाचा- आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
पुढे रणबीर म्हणाला वडिलांसह मी आईचा देखील अनेकदा मार खाल्ला आहे. “आईने मला चुका सुधारण्यासाठी मिळेलत्या वस्तुंनी मारलं आहे. एकदा तर कपडे अडकवण्याच्या हँगरने देखील मी मार खाल्ला आहे”. रणबीर या कार्यमात अशा अनेक आठवणी शेअर केल्या शिवाय रणबीरची आई नीतू कपूर यांनी देखील अनेक जुन्या आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या. (Rishi Kapoor Slaps Ranbir Kapoor)
आणखी वाचा- आलिया भट्ट व रणबीर कपूर नव्या बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव, घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर आलिया ने काही दिवसांपूर्वी नवीन बंगला खरेदी केला. आपल्या मुलीवर अपार प्रेम करणारा रणबीर त्यांच्या बंगल्याचं नाव राहा ठेवू शकतो असं देखील काही चाहत्यांचं म्हणणं आहे. . या आलिशान बंगल्याशिवाय रणबीर व आलिया यांच्याकडे वांद्रे येथे आणखी ४ फ्लॅट आहेत. ज्यांची एकूण किंमत 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.