मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांच्या अनेक लाडक्या जोड्या आहेत. यापैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे. अमृता व प्रसाद ही प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बरेचदा ही जोडी एकत्र दिसली होती, तेव्हापासून या जोडीमध्ये अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र नात्याबद्दलचा अधिकृत खुलासा त्यांनी बऱ्याच काळानंतर केला. (Prasad Amruta Romantic Date)
प्रसाद अमृताने थेट साखरपुडा सोहळा उरकल्याचे काही फोटो सोशल मीडियारून शेअर करत त्यांच्या नात्याबद्दलचा अधिकृत खुलासा केला. चाहत्यांना आनंद देणारी ही गोष्ट होती. शिवाय त्यांनी त्यानंतर त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली. साखरपुड्यानंतर आता चाहत्यांना प्रसाद अमृताच्या लग्नाची ओढ लागून राहिली आहे. प्रसाद अमृताच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसाद अमृताने त्यांच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर केला होता.
त्यानंतर आता अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या त्यांच्या पहिल्या रोमँटिक व आठवणीतल्या डेटच्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिगबॉस नंतर अमृताचं रंगभूमीवर सध्या ‘नियम व अटी लागू’ हे नाटक तुफान सुरु आहे. आता या नाटकाचा प्रदेश दौरा देखील सुरु झाला आहे. युएस टूर साठी ही नाटकांची टीम निघाली आहे. बरं अमृताचा हा परदेश दौरा एका महिन्याहून अधिक काळचा आहे. परदेश दौऱ्याला जाण्यापूर्वी अमृता व प्रसादची रोमँटिक डेट झाली. शिवाय प्रसाद अमृताला एअरपोर्टवर सोडायला देखील आला होता. याचा एक रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
परदेश दौऱ्याला जाण्यापूर्वी प्रसाद व अमृताची रोमँटिक डेट सध्या चर्चेत आहे. अमृताने “युएस टूरला जाण्यापूर्वीची एक आठवणीतील डेट” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकंच नव्हे तर या व्हिडिओमध्ये त्यांच्या रोमँटिक अंदाज ही पाहायला मिळतोय.