सिनेसृष्टीतील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अनेकदा मालिका किंवा चित्रपटात काम करणाऱ्या नायक आणि नायिकेच्या जोड्या प्रेक्षकांना आवडू लागतात. ‘देवयानी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. संग्राम सन मराठी वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर खुशबू झी मराठी वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. संग्राम व खुशबू सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी इन्स्टामद्वारे ते शेअर करताना दिसतात.(Sangram & Khushboo love story)
संग्राम व खुशबू यांची प्रेमकहाणी गैरसमजातून सुरु झाली. खुशबू ‘एक मोहर अबोल’ या मालिकेत काम करत असताना संग्राम त्या सेटवर नेहमी जात असे. तेव्हापासून खुशबू संग्रामला नावाने ओळखत होती. संग्राम खूप काम करतो त्याला खूप गर्व आहे असं खुशबू ऐकून होती. तेव्हाच ‘देवयानी’ या मालिकेत खुशबूची एन्ट्री झाली. संग्रामबद्दल गैरसमज असल्याने ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर खुशबू संग्रामपासून लांब रहायची. हळूहळू दोघेही एकत्र काम करत असताना त्या दोघांमधील गैरसमज दूर झाले.
हे देखील वाचा: “कलाकारांमध्ये खोटेपणा असतोच आणि…”, संजय मोने यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, “खोटेपणा करुन पैसा मिळवणं हा…”
एक दिवस सेटवर संग्रामने खुशबूसाठी नाश्ता मागवला होता. नाश्ता पाहून ती खूश झाली. संग्राम हा चांगला व्यक्ती आहे हे तिला पटू लागलं. यानंतर कालांतराने त्यांच्या दोघांमधील अंतर कमी झालं. त्यांच्यात मैत्री होऊ लागली. संग्रामच्या मेकअप मॅनने खुशबूला भाभी अशी हाक मारली होती. त्यानंतर खुशबूला याबाबत थोडी शंका आली. एकदा सेटवर सगळ्या कलाकारांनी एकमेकांबरोबर फोटो काढले. ते फोटोज शेअर करण्याच्या हेतूने एकमेकांचे नंबर एकमेकांना मिळाले. जेव्हा संग्रामला खुशबू आवडू लागली आहे हे लक्षात आलं तोपर्यंत ‘देवयानी’ या मालिकेतील तिची भूमिका संपली होती.
हे देखील वाचा: “जगाचे नियम मोडून…”, शिवानी सुर्वेसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट, म्हणाला, “आपल्या वागण्यावर…”
जसजशी मैत्री वाढू लागली त्यानंतर त्या दोघांनी बाहेर भेटायचं ठरवलं. खुशबूला भेटल्यानंतर संग्रामने हटके प्रपोज केलं. ‘माझ्याबरोबर म्हातारं व्हायला आवडेल का?’ असं विचारल्यानंतर खुशबू भारावून गेली. थोडावेळ घेऊन तिने संग्रामला होकार दिला. ‘लग्नानंतर आपण नवरा- बायको म्हणून नाही तर मित्र मैत्रीण म्हणून राहून मज्जा करूयात’ असं संग्रामने खुशबूला सांगितले होते. आजही ते दोघं एकमेकांबरोबर आनंदाने संसार करत आहेत. संग्राम, खुशबू आणि त्यांचा मुलगा राघव या तिघांचं कुटुंब चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.