कलाविश्वातील मंडळी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरजंन करतात. कलाकार नेहमी आनंदी आयुष्य जगत असतात असं प्रत्येक प्रेक्षकाला आणि त्या कलाकारांच्या चाहत्याला वाटत असतं. पण कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात घडत असलेल्या घटनांचा परिणाम कधीच त्यांच्या कामावर दिसत नाही. सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीने देखील तिच्या कठीण काळाबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘पुढचं पाऊलं’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहचली. जुईने तिच्या सोज्वळ भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येही जुई सहभागी झाली होती.(jui gadkari incident)
छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत जुई दिसत आहे. एका मुलाखतीत जुईने तिच्या आयुष्यातील अगदीच कठीण प्रसंगाबाबत सांगितलं. “’पुढचं पाऊल’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान जुईला विविध शारीरिक त्रास जाणवू लागले. ‘एकदा डोकं दुखायला लागलं की, पुढचे २० दिवस माझं डोकं दुखायचं, केस गळायचे, भुवया आणि पापण्याही गळू लागल्या. तरीही मी ४-५ वर्ष हा त्रास अंगावर काढत गेले. डॉक्टरकडे जाऊन तात्पुरता आराम मिळत होता. हळूहळू मला हा आजार वेगळाच असल्याचं जाणवू लागलं. मग मी डॉक्टरकडे जाऊन चेकअप केल्यानंतर समजलं मला पिट्यूटरी ट्युमर झाला आहे”. जुईला मालिकेमध्ये काम करणंही थांबवावं लागलं.
हे देखील वाचा : पाठकबाईंच्या पहिल्या मंगळागौरीचा थाट, हातावर राणादाच्या नावाच्या मेहंदीचा चढला रंग, व्हिडीओमध्ये दिसली झलक
पुढे जुई म्हणाली, “हे ऐकल्यावर मला धक्का बसला. मग माझ्या गोळ्या सुरु झाल्या. तरीही मला होणार त्रास थांबत नव्हता. त्यानंतर पुन्हा मी चेकअप केल्यानंतर मी Rheumatoid arthritis पॉझिटिव्ह असल्याचं मला समजलं. तेव्हा मग मी ठरवलं आता या आजराशी लढायचं. याआधी बराच त्रास सहन केला आहे आता या त्रासाचाही मी सामना करेन. यापेक्षा आणखी काय वाईट होऊ शकतं? या त्रासात माझे हातपाय चालू आहेत मग मी यावर मात करू शकते”.
हे देखील वाचा : “लोकांना अजून किती लुटणार?”, मुंबई-पुणे हायवेवर दुप्पट टोल घेतल्याप्रकरणी सौमित्र यांचा संताप,
यापुढे करोना काळात जुईने स्वतःची काळजी कशाप्रकारे घेतली याबद्दल बोलताना तिने सांगितलं की, “करोना काळात जग थांबलं होत. तेव्हा मी त्या २ वर्षांचा पुरेपूर वापर केला. योगाचे प्रकार , पोषक आहार घेत होती त्यानंतर मी पूर्णपणे बरी झाली. या संघर्षाच्या काळात कामामुळे मी अजून खंबीरपणे लढू शकले. माझा देवावर खूप विश्वास आहे. त्यामुळे हा माझा पुनर्जन्म आहे”. जुईने गंभीर आजारांवर मात करत पुन्हा एकदा तिच्या कामाला नव्याने सुरुवात केली आहे.